(Image Credit : Medical News Today)
एका ताज्या रिसर्चमध्ये पहिल्यांदाच समोर आलं आहे की, हृदयाशी संबंधी एका आजारात हृदयापेक्षा जास्त हा मेंदूचा हात असतो. अभ्यासकांना असं आढळलं की, 'ब्रोकन हार्ट सिंड्रोम' च्या रुग्णांमधील मेंदूच्या काही खास भागांचा आपसातील ताळमेळ गडबडून जातो. हे तेच भाग आहेत जे भावनांना नियंत्रित करण्यासोबतच शरीराच्या क्रिया जसे की, हृदयाचं धडधडणं, श्वास घेणे आणि पचनक्रिया नियंत्रित करतो.
यूरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ब्रोकन हार्ट सिंड्रोम एक असा आजार आहे ज्यात अचानकपणे हृदयाच्या काही मांसपेशी काही काळासाठी कमजोर होतात. त्यामुळे हृदयाच्या खालला डावा भाग फूगतो. तर त्याचा वरचा भाग आकुंचन पावतो. याचा आकार जपानमध्ये ऑक्टोपस पकडण्यासाठी केल्या जाणाऱ्या पिंजऱ्यासारखा होतो. यावरून याला टाकोटसूबो सिंड्रोम किंवा टीटीएस असेही म्हटले जाते.
महिलांमध्ये हा आजार अधिक
या आजाराबाबत पहिल्यांदा १९९० मध्ये माहिती मिळाली होती. अभ्यासातून समोर आलं आहे की, दु:खं, राग, भीती किंवा फार जास्त आनंदच्या भावनेमुळे या सिंड्रोमची सुरूवात होते. रुग्णाला छातीत वेदना होऊ लागतात आणि श्वास घेण्यासही अडचण होते. याने त्या व्यक्तीला हृदय विकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो. परिस्थिती गंभीर झाल्यावर यात जीव सुद्धा गमावला जाऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात असतो, केवळ १० टक्के पुरूषांमध्येच हा आजार आढळतो.
या रिसर्चमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे प्राध्यापक क्रिश्चियन टेम्पलिन म्हणाले की, 'हे फारच आश्चर्य आहे की, मेंदूचे चार भाग जे एकमेकांपासून दूर आहेत, पण एकमेकांना सूचना-संकेत देत असतात. आम्हाला आढळलं की, टीटीएसच्या रुग्णांमध्ये सूचनांचं हे आदानप्रदान कमी होत जातं. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, या रिसर्चमधून हृदय आणि मेंदूच्या यांचा संबंध समजून घेण्यासाठी फार मदत मिळाली.
एका वेगळ्या रिसर्चनुसार, घटस्फोट, प्रेमात दगा, एखाद्या जवळ्याचा मृत्यू किंवा जोडीदारासोबत कोणत्या प्रकारचं भांडण याचं मुख्य कारण मानले जातात. या सर्वच घटनांचा महिलांवर जास्त प्रभाव बघायला मिळतो. ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनच्या रिसर्चनुसार, या आजारामुळे लोकांचा मृत्यू होण्याचं एक मोठं कारण म्हणजे मसल्समध्ये कमजोरी असणे आहे. या रिसर्चमध्ये ५२ ब्रोकन हार्ट सिंड्रोमने पीडित रुग्णांना ४ महिने निरीक्षणात ठेवण्यात आलं होतं.
ब्रोकन हार्ट सिंड्रोमबाबत सध्या वेगवेगळे रिसर्च सुरु आहेत. पण यापासून होणाऱ्या हृदयरोगांच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.