योग्य नाश्ता करणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना एका दिवसात वापरलेली कॅलरी ही एक महत्वाची बाब आहे. नाष्ता हा आपल्या रोजच्या जेवणाचा एक महत्वाचा भाग आहे. निरोगी आणि संतुलित नाष्ता घेतल्यामुळे आपल्या दिवसाची सुरूवात उत्कृष्ट उर्जेच्या पातळीसह होते. एक निरोगी नाश्ता आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये अनावश्यक कॅलरी घेण्यास प्रतिबंध करतो.
नकळतपणे तुम्ही न्याहरीशी संबंधित काही चुका करता ज्यामुळे तुमचे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो आणि तुमचे वजन वाढते. नुकत्याच झालेल्या अभ्यासात न्याहारी संदर्भात अशाच काही सामान्य चुकांची माहिती समोर आली आहे. आम्ही तुम्हाला न्याहरीच्या केल्या जात असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याच्या मार्गावर येणारे अडथळे येऊ दूर करू शकता.
नाष्त्यासाठी कॅफिनचे सेवन
बरेच लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. जास्त प्रमाणात कॅफिन पिण्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्याऐवजी आपण इतर पर्याय जसे मिल्कशेक, स्मूदी, दूध, हॉर्लिक्स, बोर्नविटा या प्रकारच्या पदार्थांचा समावेश करू शकता.कारण आपल्या नाष्त्यामध्ये कॅफिनचा समावेश जास्त असल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
फक्त फळांचा रस पिणं
रसात फायबर नसते. न्याहारीमध्ये रस पिल्याने काही काळानंतर भूक लागते. याव्यतिरिक्त, साखरेच्या अतिरिक्त प्रमाणात पॅक केलेल्या रसांमध्ये पौष्टिक मूल्य कमी असते. म्हणून, न्याहारीमध्ये केळी, सफरचंद, पेरू, हंगामी संत्री ही फळं आणि भाज्यांचे सूप असणे आवश्यक आहे कारण त्यात फायबर्स असतात. एका अभ्यासानुसार, एका दिवसात आपल्या आहारात 14 ग्रॅम फायबर खाल्यानं 10% कॅलरीजची गरज पूर्ण होते.
कार्बोहायड्रेट्सकडे दुर्लक्ष करा
आपल्या न्याहारीमध्ये उच्च कार्बोहायड्रेट पदार्थांचा समावेश करण्याची चूक कधीही करु नका. लो-कार्ब डायट बॉडीमध्ये साठवलेले अतिरिक्त पाणी आणि वजन कमी करण्यास मदत करते. आपण चरबी कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास आपल्या नाश्त्यात नेहमी कमी कार्बोहायड्रेटच्या वस्तूंचा समावेश करा.
अतिसाखरयुक्त पदार्थ खाऊ नका
कोणा कोणाला गोड पदार्थ आवडत नाही, गोड खाणे हृदय आणि मन दोघांनाही आनंदित करते, परंतु आपणास हे माहित आहे की अतिरिक्त साखर आपल्या अन्नामध्ये अतिरिक्त कॅलरी जोडते तसेच आपले वजन देखील वाढवते. यामुळे पोट आणि यकृतामध्ये चरबी जमा होते ज्यामुळे चयापचय समस्या उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त, आपल्याला बर्याच रोगांचा धोका देखील असू शकतो. न्याहारीत साखरेने भरलेले पदार्थ खाऊ नका. साखरेऐवजी गूळ खा. खासकरून जेव्हा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहात. हिवाळ्यात 'या' ५ पीठांपासून बनवलेली भाकरी खाल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाणं विसराल
प्रोटिन्स न खाणं ठरू शकतं लठ्ठपणाचं कारण
प्रोटीन वजन कमी करण्याच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये, प्रोटीनचे सेवन आपले पोट जास्त काळ भरलेले ठेवेल. योग्य प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्याने शरीरावर चरबी जमा होत नाही. याव्यतिरिक्त, चयापचय प्रक्रियेस गती देऊ शकते. आपल्या न्याहारीमध्ये अंडी, संपूर्ण धान्य, दुग्धजन्य पदार्थ, शेंगदाणे यांसारख्या प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. जीवघेण्या ठरू शकतात भेसळयुक्त पीठाच्या चपात्या; 'असा' ओळखा बनावट अन् चांगल्या पीठातील फरक