निरोगी राहण्यासाठी, आरोग्यदायी नाश्ता करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्याप्रमाणे हलके, पौष्टिक आणि आरोग्यदायी रात्रीचे जेवण तुमचे पाचक आरोग्य अबाधित राखण्याची खात्री देते, त्याचप्रमाणे आरोग्यदायी आणि भरभरून नाश्त्यामध्ये दिवसाची सुरुवात उत्तम करण्याची क्षमता असते. डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह झी न्युजला दिलेल्या माहितीत सुचवतात की, प्रथिनांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा, जसे की कोंब असलेले कडधान्य , उकडलेले अंडे, हरभरा, सोयाबीन, सकाळी दूध घ्या. यामुळे भूक कमी होईल आणि शरीर दिवसभर एनर्जीने भरलेले राहील. नाश्त्यासाठी प्रथिनेयुक्त पदार्थ खा.
नाश्त्यात भिजवलेले बदाम खा :- तुम्ही नाश्त्यात बदामाचा समावेश करू शकता. हे अनेक पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. बदामामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, मॅंगनीज, प्रथिने, फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे तुमच्या रोजच्या नाश्त्याच्या आहारात मूठभर बदामांचा समावेश करावा.
नाश्त्यात शेंगदाणे खाणे :- नाश्त्यामध्ये शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी शेंगदाणे पाण्यात भिजवून सकाळी सेवन करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, लोह आणि सेलेनियम यांसारख्या गुणधर्मांनी समृद्ध शेंगदाणे भिजवल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडीटीची समस्या दूर होते.
नाश्त्यात एक वाटी दही खाणे :- आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह सांगतात की, प्रत्येकाने नाश्त्यात एक वाटी दह्याचा अवश्य समावेश करावा. दही हे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. नाश्त्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दह्यात प्रोबायोटिक्स असतात, जे तुमचे पोट स्वच्छ ठेवतात आणि तुमची पचनशक्तीही चांगली राहते.