ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वाधिक उद्भवणारा आजार आहे. जगभरात बेस्ट कॅन्सरमुळे लाखो महिलांचा अकाली मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरसाठी महिलांवर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार २०२० मध्ये या आजारामुळे जवळपास ७ लाख १२ हजार ७५८ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. २०२५ पर्यंत हा आकडा ८ लाखांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
आयुर्वेदानुसार स्तनांच्या कॅन्सरचे सगळयात मोठं कारण हे आपली दिनचर्या हे आहे. जीवशैलीतील बदलांमुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मांस, अंड, दारू, नशायुक्त पदार्थ यांमुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कँन्सरचा धोका वाढतो. आयुर्वेदानुसार जर झोपण्याची स्थिती योग्य नसेल तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. महिलांच्या ब्रेस्टमध्ये जखम झाल्यास दुग्ध नलिकांवर परिणाम होतो त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.
आयुर्वेदाच्या प्रभावी उपचारातून एखाद्याला ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून आराम मिळू शकतो. आयुर्वेद ही एक प्राचीन आयुर्वेदिक औषध प्रणाली आहे जी गंभीर आजारांच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहे आणि या औषधाच्या यंत्रणेचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याबाबत अधिक माहिती ओन्ली माय हेल्थशी बोलताना आयुर्वेद विशेषज्ञ डॉ चंचल शर्मा यांनी दिली आहे.
लक्षणं
- स्तनांमध्ये गाठ
- स्तनांचा बदललेला आकार
- एक भाग कठीण जाणवणे
- त्वचेच्या पोतामध्ये बदल (संत्र्याची सालीसारखा दिसणे)
- लालसर पणा, पुरळ येणे
- स्तनांग्रंथामधून कोणताही दाब न देता द्रव बाहेर पडणे (Nipple Discharge)
- काखेजवळ सूज, वेदना होणे
प्रत्येक स्त्रीने योग्य सर्जनकडून तपासणी करणे गरजेचे आहे.
आयुर्वेदातील ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार
ब्रेस्ट कॅन्सरच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरतात. आयुर्वेदाच्या हर्बल औषधांचे नियमित सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी आयुर्वेदची पंचकर्म थेरपी देखील एक प्रभावी पर्याय आहे. आयुर्वेदात आहारावर अधिक जोर देण्यात आला आहे आणि जर सुरुवातीच्या लक्षणे माहित असतील तर विशेष आहार आणि आयुर्वेदिक औषधांद्वारे ब्रेस्ट कॅन्सर दूर केला जाऊ शकतो. आयुर्वेद ब्रेस्ट कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या महिलांना अधिक व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न खाण्याचा सल्ला देतो. कारण ब्रेस्ट कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये असे दिसून आले आहे की ज्या महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला
या पदार्थांचे सेवन करायला हवं
लसूण आणि कांद्याचे सेवन ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचवू शकते.
द्राक्षं, मनुक्यांचा आहारात समावेश करायला हवा.
ग्रीन टी चे सेवन करायला हवे
आलं किंवा सुंठाचा आहारात समावेश करायला हवा.
ब्रेस्ट कॅन्सरपासून बचावासाठी या पदार्थांचे सेवन टाळा
दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करू नका.
धुम्रपान करू नका.
चहा, कॉफीपासून लांब राहा.
उडीद किंवा मसूरच्या डाळीचे सेवन करा.
अंडी, मासे यांचे अतिसेवन टाळा. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे