सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. दिवसागणिक ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतामध्ये अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आढळून येतात. अनेक महिलांच्या मनात स्तनाच्या कर्करोगाबाबत भिती निर्माण झाली आहे. कारण देशभरातील महिलांच्या एकूण संख्येतील एक लाख महिलांपैकी तीस टक्के महिला या स्तनाच्या कर्करोगाने पीडित आहेत. ब्रेस्ट कॅन्सरमध्येही अनेक प्रकार आढळून येतात. सुरूवातीच्या काळातच या आजाराबाबत समजल्यामुळे यावर उपचार करणं सोपं होतं.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं :
- ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर स्तन किंवा काखेमध्ये सूज येते.
- स्तनाच्या निप्पल्समधून पाणी किंवा रक्त येऊ लागते.
- स्तनावर सूज किंवा लालसरपणा येतो.
- स्तनाच्या आकारातही फरक पडतो. जसं की, एकाचा आकार लहान तर एकाचा आकार मोठा दिसू लागतो.
- स्तनावर काही पूरळ येतात तर अल्सर तयार होतात. जे अनेक उपचार केल्यानंतरही ठिक होत नाहीत.
वयाच्या चाळीशीनंतर धोका :
जास्तीत जास्त महिलांमध्ये या आजाराची लक्षणं वयाच्या चाळीशीनंतर दिसू लागतात. ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्यास स्तनावर एक छोटी गाठ दिसू लागते, जी हळूहळू मोठी होत जाते. जर तुम्हाला या आजारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्यासाठी आधीपासूनच सावधानता बाळगणे गरजेचं असतं.
मॅमोग्राम करा :
महिलांना मॅमोग्राम टेस्ट करणं गरजेचं असतं. मॅमोग्राम केल्याने स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं दोन ते पाच वर्षांमध्ये समजणं शक्य होतं. ज्या महिलांना अशी शंका असेल की, त्यांना काही अनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यांनी तपासण्या करण्याआधी जेनेटिक काउंसिलरकडून सल्ला घेणं गरजेचं असतं.
आहारामध्ये या पदार्थांचा करा समावेश :
डाळिंब
डाळिंबामध्ये असणारी पोषक तत्व फोटोकेमिकल्स एरोमाटेज एंजाइमला रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. हे एंजाइम एंड्रोजन हार्मोनला एस्ट्रोजन हार्मोनमध्ये बदलतं. जे ब्रेस्ट कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरतात. हे तत्व एरोमाटेज एंजाइमला रोखण्यास मदत करतं. त्यामुळे कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त डाळिंबामध्ये नॅचरली अशी काही तत्व असतात ते ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी प्रभावी ठरतात. ब्रेस्ट कॅन्सरपासून पीडित असलेल्या जास्तीत जास्त महिला एरोमाटेज एंजाइम नष्ट करण्यासाठी अनेक औषधं घेतात. ज्यामुळे एस्ट्रोजन हार्मोनचा विकास होत नाही.
अक्रोड
अक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन बी6, कॅल्शिअम आणि इतर मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. एवढचं नव्हे तर अक्रोड प्रोटिनचादेखील चांगला स्त्रोत आहे. जवळजवळ अर्धी वाटी अक्रोडमध्ये 9 ग्राम प्रोटिन असतात. अक्रोड फक्त स्तनाच्या कॅन्सरवरचं नाही तर अस्थमा, अर्थरायटिस, स्किन इन्फेक्शन, एक्जीमा यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यास फायदा होतो.