श्वास घेण्याची समस्या मुख्य रूपाने जास्त लोकांना समजून येत नाही. कारण त्यांना या समस्येची लक्षणे स्पष्टपणे माहीत असतात ना त्यांना या समस्येची कारणे माहीत असतात. त्यामुळे अनेकजण सुरूवातीला या समस्येकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत जाते. आज आपण श्वास घेण्यास समस्या होणाऱ्या तीन कारणांबाबत जाणून घेऊ....
सूज आणि इन्फेक्शनमुळे
श्वासनलिकेत सूज, इन्फेक्शन किंवा कोणत्याही इतर कारणाने जेव्हा ऑक्सिजन पुऱेशा प्रमाणात शरीरात प्रवेश करत नाही. तेव्हा तुम्हाला छोटे श्वास घ्यावे लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही आधीसारखा मोठा श्वास घेत होते त्यातुलनेत तुमच्या श्वासांचा कालावधी छोटा होऊ लागतो. ही समस्या जर फार जास्त काळापासून सुरू असेल तर अस्थमा, निमोनिया किंवा क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीजचं(सीओपीडी)ची लक्षणे असू शकतात. (CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...)
तणावामुळे
जे लोक फार जास्त तणावात राहतात त्यांनाही श्वास घेण्याची समस्या होऊ शकते. ते एकतर फार लवकर लवकर श्वास घेतात किंवा छातीत जडपणा जाणवत असल्या कारणाने त्यांची श्वास घेण्याची गती हळूवार होते. या दोनही स्थितीत त्यांचं घेण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण येते.
(Image Credit: healthjade.net)
अधिक वजन वाढणे
ज्या लोकांचं वजन जास्त असतं त्यांनाही श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. कारण अशा लोकांना दम लवकर लागतो. दम लागल्या कारणाने ब्रिदींग पॅटर्न डिस्टर्ब होतं आणि फुप्फुसात पुरेसा ऑक्सिजन सप्लाय होऊ शकत नाही. (रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? वाचा तज्ज्ञांनी दिलेल्या BP नियंत्रणात ठेवण्याच्या टीप्स)
काय काळजी घेऊ शकाल
- जर तुम्हाला फुप्फुसात इन्फेक्शन किंवा छातीत जडपणा वाटण्याची समस्या असेल तर जराही वेळ न घालवता लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.
- तज्ज्ञांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक काढा आणि चहाचं नियमित सेवन करा. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा गरम पाण्याचं सेवन करा. या उपायांनी तुम्हाला जरा आराम मिळेल.
- तसेच प्राणायाम, ध्यान आणि योगा करा. वॉकिंग आणि रनिंग करा. याने तुमची फुप्फुसे मजबूत होती. ब्लड सर्कुलेशन योग्य होण्यासही मदत होईल.
- दिवसा कमीत कमी २ तास घराची दारे आणि खिडक्या उघड्या करून ठेवा. याने तुमच्या घरातील दूषित हवा बाहेर निघून जाईल.