Who Should not eat Brinjal: वांग्याची भाजी अनेकांना आवडते. लोक वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी खातात. कुणी वांग्याचं भरीत खातात, कुणी मसाल्याची वांगी तर कुणी आणखी वेगळ्या पद्धतीने. बऱ्याच लोकांना वांगी आणि बटाटे सोबत खाणं आवडतं. वांग्याची भाजी लोक बाराही महिने खातात. वांगी खाण्याचे आरोग्याला जसे अनेक फायदे आहेत तसे काही नुकसानही आहेत.
हिवाळ्यात वांगी खाणं फार हेल्दी मानलं जातं. वांग्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहतं आणि हृदयरोगांमध्येही याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. मात्र, वांगी सगळे लोक खाऊ शकत नाहीत. काही लोकांसाठी वांगी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. तेच आज आम्ही सांगणार आहोत की, कुणासाठी वांग्याची भाजी खाणं नुकसानकारक ठरू शकतं.
कुणी खाऊ नये वांग्याची भाजी?
गॅसची समस्या
वांग्यामुळे गॅस तयार होतो. ज्यामुळे पोटासंबंधी आणि गॅससंबंधी समस्या होते. ज्यांना नेहमीच पोटासंबंधी किंवा गॅससंबंधी समस्या राहतात त्यांनी वांग्याची भाजी खाणं टाळलं पाहिजे.
स्कीन एलर्जी
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधी एलर्जी असेल, तर वांग्याची भाजी खाणं टाळलं पाहिजे. कारण वांग्यामुळे स्कीन एलर्जी आणखी वाढू शकते.
तणाव किंवा डिप्रेशन
वांगी अशा लोकांनीही खाऊ नये ज्यांना कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन असेल. कारण डिप्रेशनमध्ये जास्तीत जास्त लोक औषधं घेत असतात आणि वांग्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो.
रक्त कमी असेल तर...
जर तुमच्या शरीरात रक्त कमी असेल तर तुम्ही वांग्याचं सेवन टाळलं पाहिजे. कारण वांग्यांमुळे रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.
डोळ्यांसंबंधी समस्या
तुमच्या डोळ्यांमध्ये सतत जळजळ होत असेल, रूतल्यासारखं वाटत असेल, एलर्जी किंवा सूज असेल तर वांगी खाणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. या समस्या असताना वांगी खाणं टाळलं पाहिजे.
पाईल्स
अनेकांना आजकाल वेगवेगळ्या कारणांनी पाईल्सची समस्या होत असते. ही समस्या असल्यावर वांगी खाणं सगळ्यात घातक ठरू शकतं. कारण वांगी खाल्ल्याने ही समस्या अधिक वाढते.
किडनी स्टोन
वांग्यांमध्ये ऑक्सालेट नावाचं तत्व असतं. जे किडनीमधील स्टोन वाढण्याचं काम करतं. अशात वांगी चुकूनही खाऊ नये.