ब्रिस्टल: कोणत्याही सजीव व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळेच पाण्याला जीवन असं म्हणतात. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. त्याचा प्रत्यय ब्रिटनच्या ब्रिस्टलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आला आहे. जास्त पाणी प्यायल्यानं एका व्यक्तीची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कोरोनाचा नवा स्ट्रेन हातपाय पसरतोय; २० भारतीयांमध्ये लक्षणं दिसल्यानं चिंतेत भर३४ वर्षांचे ल्यूक विल्यमसन ब्रिस्टलमध्ये कुटुंबासह राहतात. ते सरकारी कर्मचारी आहेत. ब्रिटनमध्ये पहिला लॉकडाऊन सुरू होता, त्यावेळी ल्यूक यांना स्वत:ला कोरोना झाल्याचा संशय आला. दररोज दुप्पट पाणी प्यायल्यास कोरोनावर मात करू, असा विचार त्यांनी केला. सर्वसामान्यपणे माणूस दिवसाला १ ते २ लीटर पाणी पिऊ शकतो. डॉक्टरांकडूनदेखील इतक्या प्रमाणातच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. भय इथले संपत नाही! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेनल्यूक दिवसाला ४ ते ५ लीटर पाणी पिऊ लागले. त्यामुळे त्यांच्या शरीरातलं सोडियमचं प्रमाण कमी होऊ लागलं. सातत्यानं पाणी पित असल्यानं सोडियमचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झालं. त्यामुळे एके दिवशी ल्यूक भोवळ येऊन पडले. 'ल्यूक अंघोळीसाठी गेले असताना त्यांना भोवळ आली. ते बाथरूममध्ये कोसळले. लॉकडाऊन असल्यानं मला शेजारच्यांची मदत मिळाली नाही. रुग्णवाहिका येण्यासाठी ४५ मिनिटं लागली. रुग्णवाहिका येण्याच्या २० मिनिटांपर्यंत ल्यूक बेशुद्ध होते,' अशी माहिती त्यांच्या पत्नीनं दिली.काही दिवसांपासून जास्त पाणी पित असल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 'अतिशय जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातील मिठाचं प्रमाण अत्यंत कमी झालं. त्यामुळे ल्यूक यांची प्रकृती बिघडली. त्यांना दोन-तीन दिवस आयसीयूत ठेवण्यात आलं. ते व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यानं ल्यूक यांची प्रकृती सुधारली,' असं ल्यूक यांच्या पत्नीनं सांगितलं.
CoronaVirus News: कोरोना होऊ नये म्हणून रोज प्यायचा ५ लीटर पाणी अन् मग घडलं असं काही...
By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 3:05 PM