सामान्यपणे भारतीय घरांमध्ये पांढऱ्या तांदळाचा भात खाल्ला जातो. हे तांदूळ सहज शिजणारे आणि पचन होणारे असतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, पांढऱ्या तांदळाऐवजी काळे, ब्राउन आणि रेड तांदुळही असतात ज्यांचे अनेक फायदे आहेत. पांढरे तांदूळ एक सिंपल कार्बोहायड्रेट असतात ज्याचा अर्थ आहे की, तुमचं शरीर त्याला सहजपणे तोडू शकतं. तसेच पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेटला अधिक वेगाने अवशोषित करू शकतात. पण ब्राउन, ब्लॅक आणि रेड तांदळांना पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त हेल्दी मानलं जातं.
पांढऱ्या तांदळाचे फायदे
पांढऱ्या तांदळातून आपल्याला ऊर्जा मिळते. आपलं शरीर याला सहजपणे तोडू शकतं. तसेच यातील पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेट वेगाने अवशोषित होतात. कारण यात चोकर कमी असतं. सोबतच यात फायबर आणि फॅटचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे पांढरे तांदूळ लोकांसाठी एक चांगला पर्याय आहेत.
ब्राउन राइस
ब्राउन राइस एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे फायबर, प्रोटीन आणि फॅटने भरलेले असतात. हे पचनणं काही लोकांसाठी फार अवघड असू शकतात. पांढऱ्या तांदळांमुळे शरीरातील जळजळ कमी करता येते, पण ब्राउन राइस हे काम थोडं उशीरा करतं. जर तुम्हाला गंभीर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर पांढरे तांदूळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात.
रेड राइस
पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत रेड राइस तेवढं कॉमन नाहीये. हा राइस महाग असतो. तसेच दुकानांमध्ये फार कमी उपलब्ध असतो. पांढरे तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी पूर्णपणे खराब ठरू शकत नाही. जर तुम्ही हे कमी प्रमाणात खाल्ले तरच. पण रेड राइस तुम्हाला सगळ्या स्थितीत फायदे देतो. पोष्टिक जेवण बनवण्यासाठी तुम्ही यात इतर पौष्टिक गोष्टींचं मिश्रण करू शकता. रेड राइजमध्ये अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जसे की, सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि बिटा कॅरोटीन.
ब्लॅक राइस
ब्लॅक राइस फार हेल्दी मानले जातात. यातील एंथोसायनिन डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. नियमितपणे यांचं सेवन केलं तर मोतिबिंदू आणि डायबिटीक रेटिनोपॅथीसारखा धोका कमी करण्यास मदत मिळतो. ब्लॅक राइसमधील अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व हृदय हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. तसेच याने डायबिटीसचा धोकाही कमी होतो.