शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर का असते फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 5:11 PM

पांढऱ्या साखरेपेक्षा (White Sugar), ब्राउन शुगरचा (Brown Sugar) वापर केल्यास अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. आहारतज्ज्ञ व डॉक्टरही ब्राउन शुगर, ब्राउन राइस खाण्याचा सल्ला देतात. सर्वसाधारण साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगर उपयुक्त ठरू शकते.

निरोगी आयुष्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. आहारात भाजीपाला, डाळी, फळं, भात आदी घटकांचा समावेश असणं गरजेचं असतं. दुसरीकडे दररोज चहा, कॉफी किंवा मिठाईच्या माध्यमातून आपण साखरेचं सेवन करत असतो. गोड जास्त प्रमाणात खाणं म्हणजे स्थूलत्व (Obesity), हृदयरोग (Heart Disease), टाइप-2 डायबेटीस (Diabetes), यकृताशी संबंधित आजार (Lever Disease) आदी आजारांना निमंत्रण देण्यासारख आहे. गोड पदार्थ आवडणाऱ्या व्यक्ती अनेकदा यावर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. त्यामुळे पांढऱ्या साखरेपेक्षा (White Sugar), ब्राउन शुगरचा (Brown Sugar) वापर केल्यास अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. आहारतज्ज्ञ व डॉक्टरही ब्राउन शुगर, ब्राउन राइस खाण्याचा सल्ला देतात. सर्वसाधारण साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगर उपयुक्त ठरू शकते.

ब्राउन शुगरमध्ये आहेत पोषक घटकब्राउन शुगरमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. आरोग्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यात फॅट्स (Fat), कोलेस्टेरॉल, प्रोटीन असत नाही. परंतु, ब्राउन शुगरचे सेवन केल्यास अनेक प्रकारची खनिजं (Minerals) मिळत असतात. यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, कार्बोहायड्रेट्स हे घटक असतात. कॅलरीज कमी प्रमाणात असतात.

ब्राउन शुगरचे फायदे अनेक'हेल्दीफाय मी डॉट कॉम'वरच्या संदर्भानुसार, सर्वसाधारण साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगरचे अनेक फायदे सांगितले आहेत. यात कॅलरीज कमी असतात. मोलासेस (Molasses) नावाचा घटक असतो. यामुळे चयापचय (Metabolism) वाढण्यास मदत होते. यात अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. वजन कमी करत असल्यास आपल्या आहारात ब्राउन शुगरचा समावेश करायला हवा. ब्राउन शुगर एक साधारण कार्बोहायड्रेट असतं. ते लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं. त्यामुळे शारीरिक ऊर्जा मिळवायची असल्यास आहारात ब्राउन शुगर असावी.

पचण्यासाठी उत्तम, बद्धकोष्ठतेवर प्रभावीब्राउन शुगर पचण्यासाठी अतिशय उत्तम आहे. पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेशी निगडित समस्या आहेत, त्यांनी ब्राउन शुगरचं सेवन करायला हवं. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा ब्राउन शुगर आणि आल्याचा (Ginger) रस करून प्यायल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. महिलांना मासिक पाळीत अनेकदा क्रॅम्प (Cramps) येतात. मासिक पाळी येण्याच्या दोन ते तीन दिवस आधी ब्राउन शुगरचे सेवन केल्यास पोटदुखी, क्रॅम्पपासून सुटका मिळू शकते.

विशेष म्हणजे, त्वचा उजळून निघण्यासाठी ब्राउन शुगरचा वापर प्रभावी ठरू शकतो. व्हाइट किंवा ब्राउन शुगर स्क्रबरप्रमाणे वापरून त्वचेवर लावल्यास त्वचेची चांगल्या प्रकारे स्वच्छता राखता येऊ शकते. त्वचेवरच्या निर्जीव पेशी (Dead Cells) नाहीशा करण्यास व त्वचा निरोगी ठेवण्यास ब्राउन शुगरचा उपयोग होऊ शकतो. यात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल घटक असल्याने ब्राउन शुगरच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो. बॅक्टेरियाशी लढण्यासाठी शरीराला ब्राउन शुगरमुळे मदत होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स