शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

कोरोनानंतर आता ब्रुसेलोसिसचा भारतात शिरकाव; दुसऱ्या महारोगराईचा धोका?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 11:11 PM

कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर आजारात याचा बदल होण्याची भीती वैज्ञानिकांना सतावते आहे.

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संक्रमणातही नवाच आजार हळूहळू डोकं वर काढत आहे. वायव्य  चीनमध्ये या विषाणूच्या संक्रमणानं अनेकांना ग्रासलेलं आहे. गांसु प्रांताची राजधानी असलेल्या लान्झहूच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) अलीकडेच याची विषाणूची खातरजमा केली आहे. 3,245 लोकांना हा आजार झाला आहे आणि इतर1,401 जणांमध्ये या विषाणूची प्राथमिक लक्षणं आढळली आहेत. सुदैवाने अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हा रोग भारतातही हातपाय पसरायला लागल्याची माहिती समोर आली आहे. मनुष्य आणि प्राण्यांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर आजारात याचा बदल होण्याची भीती वैज्ञानिकांना सतावते आहे.ब्रुसेलोसिस हा ब्रुसेला या जातीतील जीवाणूंच्या गटामुळे होतो, जो प्राणी आणि मानवांवर परिणाम करू शकतो. हा सामान्यत: एखाद्या संक्रमित प्राण्याच्या द्रवपदार्थाशी थेट संपर्क साधून कच्चा किंवा डेअरी उत्पादनांच्या माध्यमातून किंवा दूषित हवेतून लोकांमध्ये पसरतो. सीडीसीच्या मते, मानवातील संसर्ग बहुतेक दूषित अन्न खाण्यामुळे पसरतो, जे लान्झोमध्ये दिसते आहे. परंतु हा जीवाणू लैंगिक संपर्काद्वारे आणि स्तनपान देणा-या मातांपासून ते त्यांच्या बाळांपर्यंत देखील पसरतो. आपल्या त्वचेवरील छोटीशी जखमदेखील आपल्याला संसर्ग होण्यास भाग पाडू शकते.गेल्या वर्षी जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या झोंगमु लान्झो जैविक औषध निर्माण कारखान्यात गळतीमुळे ब्रुसेलोसिसचा प्रादुर्भाव झाल्याचे समजते. प्राण्यांच्या वापरासाठी ब्रुसेला लस तयार करताना कारखान्याने कालबाह्य झालेले जंतुनाशक आणि सेनिटायझर्स वापरल्याचा आरोप आहे. यामुळे कचरा वायूमध्ये मिसळून काही बॅक्टेरिया गळती झाल्याचे सीएनएनच्या अहवालात म्हटले आहे. ताप, सांधेदुखी, थकवा, भूक न लागणे, डोकेदुखी, घाम येणे ही ब्रुसेलोसिसची काही सामान्य लक्षणे आहेत. लक्षणे दिसण्यासाठी रोगाचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवस ते काही महिने लागू शकतात.बहुतेक लक्षणे कोरोना आणि फ्लूसारखीच असतात. ब्रुसेलोसिसदेखील संधिवात, स्पॉन्डिलायटीस (पाठीचा कणा सूज) यांसारख्या दीर्घकालीन लक्षणे देखील देऊ शकतो. कोरोनावर अद्याप कोणताही उपचार आढळला नाही, तर ब्रुसेलोसिसच्या उपचारांसाठी अनेक प्रतिजैविक उपलब्ध आहेत. या दोन आजारांमधील आणखी एक समानता म्हणजे ब्रुसेलोसिससाठी कोणतीही प्रभावी लस उपलब्ध नाही, तसेच कोरोनामध्ये देखील आहे. ब्रुसेलोसिसचा प्रतिजैविकांच्या माध्यमातून उपचार केला जाऊ शकतो. उपचारासाठी अनेक आठवडे ते महिने लागतात. तज्ज्ञांच्या मते, कच्चे दुग्धजन्य पदार्थ टाळणे आणि प्राण्यांबरोबर काम करताना खबरदारी घेणे हा सुरक्षित राहण्याचा उत्तम मार्ग आहे. ब्रुसेलोसिस डुकर, गायी, म्हशींसह शेतातील प्राण्यांमधून मनुष्यामध्ये संक्रमित होत असल्याचे मानले जाते. संशोधकांच्या मते, हा आजार भारतात आधीच अस्तित्वात आहे. भारतात ब्रुसेलोसिसची दरवर्षी अंदाजे 1 लाख प्रकरणे समोर येत असून, मृत्यूचे प्रमाण 2 टक्के आहे, असे एका संशोधन अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या