भारतासह जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यानंतर रुग्णांना वाचवण्यासाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टेंसिंगचा वापर केला जात आहे. तरिही कोरोना विषाणूंचा प्रसार वेगाने होत असून मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी करत असलेल्या औषधाबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे.
भारतातील फार्मा कंपनी झायडस कॅडिलाने (Zydus Cadila) गिलियाड सायन्सेस अँटीवायरल औषध रेमडेसिव्हीरचे (Remdesivir) सर्वात स्वस्त जेनेरिक औषध लाँच केले आहे. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार 100mg औषधाची किंमत 2 हजार 800 रुपये आहे. जगभरातील अनेक देशातील रुग्णालयात चाचणी दरम्यान रेमडेसिव्हिर हे औषध परिणामकारक ठरलं आहे. रेमडेसिव्हीरमुळे कोरोनाच्या लक्षणांचा कालावधी कमी होऊ शकतो. उपचारांदरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आल्यानं मागणी वाढली आहे. कोरोनासाठी कोणतेही इतर उपचार नसल्यामुळे या औषधाची मागणी भारतातील अनेक राज्यांमध्ये वाढली आहे.
अमेरिकेतील गिलियाड सायन्सेसने इबोलाच्या उपचारासाठी रेमडेसिव्हीर औषध तयार केले होते. आता भारतातील सिप्ला, जुबिलंट लाइफ, हेटरो ड्रग्स, मायलोन या कंपन्यांना रेमडेसिव्हीरचे जेनेरिक औषध भारतात तयार करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान Zydus Cadila ने आपली कोव्हि़ड-19 लस ZyCoV-D ची मानवी चाचणी सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध भागांतील हजारो लोकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. या लसीच्या मानवी परिक्षणाला सुरूवात झाली असून रोगप्रतिकारकशक्ती आणि इम्युनोजेनिसिटी किती प्रमाणात वाढते या आधारावर मुल्यांकन केलं जाणार आहे.
दरम्यान भारतात गेल्या 24 तासात 66,999 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 942 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 23,96,638 पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी, 16,95,982 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 6,53,622 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आत्तापर्यंत 47,033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
हे पण वाचा-
स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर
धूळीप्रमाणे हवेत मिसळल्यानं वाढतंय कोरोना विषाणूंचं संक्रमण? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
तुम्हालाही दाढी केल्यानंतर जळजळ आणि खाज येते? 'या' ५ उपायांनी समस्या होईल कायमची दूर