आहाराला पूरक ठरण्यात दही मोठी भूमिका बजावते. आजकाल दही चवीप्रमाणे अनेक प्रकारात विभागले जाते. दह्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. नाश्त्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु मधुमेहासारख्या आजाराने ग्रस्त असलेले लोक या संभ्रमात असतात की फ्रुट फ्लेवर्ड दही खाणं आपल्यासाठी फायदेशीर आहे की हानीकारक. फ्रुट फ्लेवर्ड दह्याव्यतिरिक्त आजकाल दह्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्याचा मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात समावेश करू शकतात. जाणून घेऊया मधुमेहाचा त्रास असलेले लोक फ्रुट फ्लेवर्ड दही खाऊ शकतात का?
मधुमेही रुग्णांसाठी फ्रुट फ्लेवर्ड दही सुरक्षित आहे का?हेल्थलाइनच्या मते साधे दही हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला आहार आहे. परंतु फ्रुट फ्लेवर्ड दही खाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. फ्रूट फ्लेवर्ड दही हे कमी फॅट दुधापासून बनवले जाते पण फ्रूट फ्लेवर्ड दह्यामध्ये फ्रूट एसेन्सेस असतात. त्यामुळे त्यामध्ये साखर आणि कार्ब्स मुबलक प्रमाणात असतात.
एक कप फ्रुट फ्लेवर्ड दह्यामध्ये सुमारे 30 ग्रॅम साखर असते. तज्ज्ञांच्या मते, फ्रूट फ्लेवर्ड दह्यामध्ये आइस्क्रीमइतकीच साखर असते. मधुमेहाचे रुग्ण फ्रुट फ्लेवर्ड दही खाण्याऐवजी साधे दही खाऊ शकतात.
मधुमेहामध्ये दह्याचे फायदेहेल्थलाइनच्या मते, दही हे आंबवलेले अन्न आहे आणि सर्व आंबलेल्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स, निरोगी बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया शरीरातील आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. निरोगी आतडे म्हणजेच हेल्दी गट लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या अनेक आजारांवर उपचार करण्याबरोबरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
दह्याचे सेवन केल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहून रक्तदाब नियंत्रित राहतो. तज्ज्ञांच्या मते साध्या दह्याचे सेवन करून टाइप २ मधुमेहाचा प्रभाव कमी करता येतो.