शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

कॅन्सरग्रस्तांना हवी मानसिक आधाराची साथ, चिकाटीनेच करता येईल आजारावर मात; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 4:27 PM

Cancer Patients : कर्करोग झाला म्हणून घाबरून न जाता या आजाराचा मुकाबला करणे गरजेचं आहे. कारण धीराने या आजाराशी लढल्यास कर्करोगातून सुखरूप बाहेर पडू शकतो.

कर्करोग हा शब्द जरी ऐकला तरी काही क्षणासाठी मनात एकच भीती दाटून येते. कर्करोगाचे निदान झाल्यास रूग्णाला पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. हा अतिशय घातक आजार असून हा रूग्णाच्या केवळ शारीरिकच नव्हेतर मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. कारण कर्करोगावरील उपचार खूप वेदनादायी, खर्चिक आणि वर्षानुवर्षे चालणारे असतात. या उपचाराचा काळावधीत रूग्णाच्या शरीरावरच नव्हेतर मनावरही अनेक घातक होतात. बरेच रूग्ण चिंता व नैराश्याच्या गर्तेत अडकलेले दिसून येतात. या आजारपणामुळे कंटाळलेल्या या रूग्णांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे. कर्करूग्णांना लढण्याचे बळ दिल्यास कर्करोगावर ते सहज मात करू शकतील.

कर्करोगाचा परिणाम केवळ एखाद्याच्या शरीरावर होत नाही तर मनावरही होतो, हे एक सत्य आहे. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागते. कर्करोगाचे निदान झाल्यास रूग्णाचे संपूर्णच बदलून जाते. कुटुंबात एकच चिंतेचे वातावरण पाहायला मिळते. कर्करोगावरील वेदनादायी उपचारात किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमुळे रूग्णाला अशक्तपणा येतो. या औषधोपचारांमुळे अनेक रूग्णांना एकाकीपणा जाणवत असल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो. परंतु, कर्करोग झाला म्हणून घाबरून न जाता या आजाराचा मुकाबला करणे गरजेचं आहे. कारण धीराने या आजाराशी लढल्यास कर्करोगातून सुखरूप बाहेर पडू शकतो. याकरता कर्करोगावरील उपचार सुरू असताना रूग्णांनी स्वतः मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

1.       मानसिक ताणतणाव, चिंता किंवा नैराश्य येऊ नये, यासाठी तुम्ही स्वतःचे मन कुठल्यातरी कामात गुंतवण्याचा प्रयत्न करा. यासाठी दैनंदिन वेळापत्रक तयार करा. 2.       दिवसभराच्या कामातून काही वेळ स्वतःसाठी काढा आणि स्वतःच्या मनाशी बोलण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपल्या शरीरात कोणते बदल असामान्य बदल होतात का हे लक्षात घेऊन त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 3.       आपल्याला कशाची चिंता वाटते, कशामुळे तुम्हाला आनंद होतो, कोणत्या गोष्टीमुळे तुमचा तणाव वाढतो यासंबंधी गोष्टी एका वहीत लिहून ठेवा. सकारात्मक विचार लिहा आणि यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळेल. 4.       जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहा. तुम्हाला कर्करोग असल्याचं निदान झाल्यास हार मानू नका. हिंमतीने या समस्येला सामोरे जा. यामुळे कर्करोगाशी लढण्याचे बळ मिळेल. 5.       नैराश्य व चिंता कमी करण्यासाठी नियमित ध्यान व योगासने करा. याशिवाय दररोज चालणे किंवा एरोबिक्स करणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 6.       तणाव कमी व्हावा, यासाठी वाचन,  संगीत ऐकणे, शैक्षणिक कार्यक्रम पाहणे, चित्रकला किंवा बागकाम करणे निवडू शकता. आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. 7.       मनातील गोष्टी कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळेपणे बोला, यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकतो. 8.       संतुलित आणि निरोगी आहाराचे सेवन करा. ताजी फळे आणि भाज्या खा. मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. मद्यपान आणि धूम्रपान करू नका. 9.       वेळोवेळी मानसिक आरोग्याची तपासणी कर्करोगाच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. नैराश्य व चिंतेत असणाऱ्या रूग्णांचे समुपदेशन केल्यास ते निरोगी आरोग्य जगू शकतात.

10.   कर्करोगावर यशस्वीरित्या मात केलेल्या रुग्णांशी बोलू शकता, कर्करोगाचा सामना करणाऱ्या रूग्णांविषयी वाचू शकता जे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल.

- डॉ. शिवांगी पवार, सल्लागार मनोचिकित्सक

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्य