वेगवेगळ्या आजारांचं जाळं दिवसेंदिवस जगभरात पसरत आहे. त्यात कॅन्सर या जीवघेण्या आजाराचंही प्रमाण वाढत आहे. यासंबंधी नुकताच एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, २०४० पर्यंत दरवर्षी जगभरात १.५ कोटींपेक्षा जास्त लोकांना कॅन्सरच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या कीमोथेरपीची गरज पडेल. उच्च मध्यम आणि मध्यम वार्षिक उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये कॅन्सरच्या रूग्णांची वाढती संख्या बघता कॅन्सरवर उपचार करणाऱ्या साधारण १ लाख डॉक्टरांची गरज भासणार आहे.
कीमोथेरपी करणाऱ्यांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ
(Image Credit : Healthline)
हेल्थ मॅगझिन 'लान्सेट ऑन्कोलॉजी'मध्ये नुकत्या प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१८ ते २०४० पर्यंत जगभरात दरवर्षी कीमोथेरपी करणाऱ्या रूग्णांची संख्या ५३ टक्क्यांच्या वाढीसह ९८ लाख ते १.५ कोटी होईल. राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि वैश्विक स्तरावर कीमोथेरपीसाठी पहिल्यांदाच एखाद्या रिसर्चमध्ये अशाप्रकारचं आकलन केलं गेलं.
(Image Credit : Mayo Clinic News Network)
कॅन्सरचं मोठं संकट
सिडनी यूनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियाच्या इंगहॅम इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड मेडिकल रिसर्च, किंगहार्न कॅन्सर सेंटर, लीव्हरपूल कॅन्सर थेरपी सेंटर आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर व लिओनच्या अभ्यासकांनी हा रिसर्च केला.
(Image Credit : Healthline)
यूएनएसडब्ल्यूचे अभ्यासक बॅ्रुक विल्सन यांच्यानुसार, जगभरात कॅन्सरचा वाढता धोका हा आजच्या वेळेला आरोग्य क्षेत्रासाठी एक मोठं संकट आहे. ते म्हणाले की, सध्या आणि भविष्यात रूग्णांच्या सुरक्षित उपचारासाठी वैश्विक कार्यबल तयार करण्यासाठी वेळीच रणनिती आखणे गरजेचे आहे.