नवी दिल्ली : ब्रिटनमधील सार्वजनिक अर्थसाहाय्यित आरोग्य सेवा प्रणाली ‘राष्ट्रीय आरोग्य सेवे’ने (एनएचएस) कर्करोगावरील उपचाराचा कालावधी तीन चतुर्थांश कमी करू शकणारी लस विकसित केली आहे. ही लस देण्यासाठी ७ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो, दरवर्षी शेकडो कर्करोगाच्या रुग्णांना सात मिनिटांत लस देणारी ही जगातील पहिलीच यंत्रणा असेल.लसीला ‘मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी’ने (एमएचआरए) मान्यता दिली आहे, असे एनएचएसने एका निवेदनात म्हटले आहे.
कशी आहे लस?- ॲटेझोलिझुमॅब हे इम्युनोथेरपी औषध आहे, जे सध्या रक्तसंक्रमणाद्वारे दिले जाते. - रुग्णाच्या रोगप्रतिकारक प्रणालीला कर्करोगाच्या पेशी शोधण्यास व नष्ट करण्यास सक्षम.- फुप्फुस, स्तन, यकृत आणि मूत्राशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांना हे औषध दिले जाते.
वेळेची बचत : लसीकरणाचा वेळ अत्यंत कमी असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.सुमारे ३,६०० रुग्णांवर प्रचलित पद्धतीने उपचार केले जाणार होते. आता मात्र त्यांचा बराच वेळ वाचणार आहे.