नवी दिल्ली : जर तुमच्या नखांच्या रंगामध्ये (सामान्यतः पांढरे आणि लाल) बदल होत असल्यास आणि नखांच्या टोकावर फुगवटा आल्यास सावध राहा. यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ (एनआयएच) च्या शास्त्रज्ञांनी याबाबत नवे संशोधन केले आहे.
हेल्थनखांच्या असामान्य स्थितीला ओनिकोपॅपिलोमा म्हटले जाते. यात नखे आकाराने मोठी होतात. नखांच्या रंगांमुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता कळते
88 लोकांच्या एकापेक्षा अधिक नखांमध्ये ओनिकोपॅपिलोमा आढळून आला. ३५ कुटुंबांतील बीएपी १ सिंड्रोम असलेल्या ४७ व्यक्तींच्या अभ्यास यासाठी झाला.
अशा वेळी काय करावे?एनआयएचच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्थरायटिस अँड मस्कुलोस्केलेटल अँड स्किन डिसिजेस (एनआयएएमएस) मधील त्वचाविज्ञान सल्ला सेवांचे प्रमुख एडवर्ड कोवेन म्हणाले की, बीएपी१ ट्यूमर प्रोडिस्पोझिशन सिंड्रोमच्या निदानाचा त्वरित विचार केला पाहिजे. हा आजार सामान्य लोकांमध्ये क्वचितच आढळून येतो. या संशोधनामुळे या आजारावर तातडीने उपचार करण्यास मदत होईल.
नेमके काय होते?- जेएएमए डर्माटोलॉजी नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ओनिकोपॅपिलोमा हा एक दुर्मिळ आनुवंशिक विकार असू शकतो.- याला बीएपी१ ट्यूमर प्रोडिस्पोझिशन सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. बीएपी१ जनुकातील उत्परिवर्तन सिंड्रोमच्या वाढीसाठी मदत करते. यामुळे कर्करोगाच्या गाठी होण्याचा धोका वाढतो.