जर कोणाचे हर्नियाचे ऑपरेशन झाले असेल तर ऑपरेशननंतरही बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऑपरेशन यशस्वीरित्या केल्यानंतर काम झाले असे होत नाही. ऑपरेशन आफ्टर केअर टिप्स पाळणेही खूप महत्त्वाचे आहे. UPMC च्या अहवालानुसार, जर एखाद्या व्यक्तीने या काही टिप्सचे पालन केले तरच जलद रिकव्हरी शक्य आहे.
सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे जड वस्तू/वजन उचलणे. जर एखाद्या व्यक्तीने शस्त्रक्रियेनंतर लगेच वजन उचलण्यास सुरुवात केली तर ते त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टींची जाणीव व्यक्तीला असणे आवश्यक आहे. जेणेकरून व्यक्ती लवकर बरी होऊ शकेल. हर्नियाच्या ऑपरेशननंतर आपल्याला कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे ते जाणून (Hernia Surgery After Care) घेऊया.
आवश्यक असलेली खबरदारी -
- शक्य तितक्या लवकर जेवत जा, शक्य असल्यास प्रथम द्रवपदार्थांचे सेवन करा आणि नंतर आपल्या आहारात काही घन पदार्थांचा समावेश करा. जर तुम्हाला पूर्वीसारखी भूक लागत नसेल तर हे पूर्णपणे नॉर्मल आहे.
- स्वतःला चांगले हायड्रेटेड ठेवा आणि दिवसातून किमान 6 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच वेदना कमी करणारे औषध घ्या. त्यांचे सेवन केल्याने, मळमळ, बद्धकोष्ठता इत्यादी लक्षणांपासून आराम मिळू शकतो.
- जर तुम्ही वेदनेसाठी औषधे घेत असाल तर अल्कोहोलसोबत घेऊ नका.
- सैल आणि आरामदायी कपडे घाला जेणेकरून ऑपरेशनच्या टाक्यांवर घर्षण होणार नाही.
- शिंकताना घाबरू नका, उशी सोबत ठेवल्यास उपयोग होईल.
- स्वतःला अॅक्टिव ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितका वेळ चालण्याचा व्यायाम करत रहा.
- पूर्ण विश्रांती घ्या आणि दुपारीही थोडा वेळ झोप घ्या.
- सुरुवातीला जास्त वजन उचलू नका आणि शक्य असल्यास पहिल्या 6 ते 8 आठवड्यात वजन अजिबात उचलू नका.
- एकाच जागी जास्त वेळ बसू नका.
- दारू आणि धूम्रपानापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.
- काही दिवस खूप घट्ट कपडे घालणे देखील चांगले नाही.
- थोडासा रक्तस्त्राव झाल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
- शरीराच्या खालच्या भागावर दबाव आणणारे व्यायाम टाळा.