बऱ्याचदा आपल्या नकळत आपला हात तोंडात जातो आणि आपण नखं खावू लागतो. एखाद्या मिटींगमध्ये, विचारात असताना अनावधानाने आपण नखं दाताने कुरतडू लागतो. पण तुम्हाला माहित आहे का? या सवयीमुळे आपण आजारी पडू शकतो. आपल्या नखांमध्ये अनेक प्रकारचे धोकादायक बॅक्टेरिया असतात. त्यांची लागण झाल्यास तुम्हाला सहज आजारी पाडू शकतात. तुम्हालाही अशी सवय असेल तर जाणून घ्या तुमच्या या सवयीमुळे तुम्ही कोणत्या आजारांना आमंत्रण देत आहात.
हाताच्या बोटांपेक्षाही नखांमध्ये जास्त असतात बॅक्टेरिया
आपल्या नखांमध्ये साल्मोनेला आणि ई कोलाई यांसारखे आजार पसरवणारे बॅक्टेरिया असतात. दातांनी आपण जेव्हा नखे कुरतडतो. त्यावेळी हे बॅक्टेरिया आपल्या तोंडात जातात. नखे खाण्याच्या या सवयीवर अनेक संशोधने झाली आहेत.
स्कीन प्रॉब्लेम्स
नखे खाण्यामुळे त्याच्या आजूबाजूला असलेले स्कीनचे सेल्स डॅमेज होतात. त्यामुळे पॅरोनेशियासारखा आजार होण्याचा धोका संभवतो. यामुळे नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला इन्फेक्शन होते. सारखी नखे खाल्याने डर्मेटोफेजियासारखे आजार होण्याचाही धोका असतो. यामध्ये त्वचेवर जखमा होतात, तसेच या इन्फेक्शनमुळे शरिरातील नसांनाही नुकसान पोहोचते.
तणावाचे कारण
एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, जास्त नखे खाणारी माणसे जास्त तणावात असतात. बऱ्याचदा तणाव वाढल्याने ते नखे खात खात आपल्याच जगात हरवून जातात. कालांतराने एकटे एकटे राहू लागतात.
कॅन्सरचा धोका
सारखी नखे खाल्याने आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. नखांमध्ये असणारे बॅक्टेरिया तोंडातून आतड्यांमध्ये जातात आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
दातांना नुकसान
नखे खाल्याने दातांनाही नुकसान पोहचते. यातून तोंडात जाणारे बॅक्टेरिया दातांवर परिणाम करतात.