(Image credit-natural news, small business trends)
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरलेले असताना सध्या एक धक्कदायक प्रकार समोर येत आहे. कोरोना व्हायरमुळे सुमारे २००० हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच अनेक कोरोनाग्रस्तांना काही देशात मारून टाकण्याच्या चर्चा सुद्धा होत आहे. पण या आजाराचा ऑनलाईनच्या माध्यामातून सुद्धा प्रसार होत आहे. ऑनलाईन पसरत चाललेला हा आजार नेमका काय आहे हे ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. ऑनलाइन पसरत चाललेला हा आजार म्हणजे कोरोनाव्हायरसच्या नावावर ऑनलाईन फ्रॉड आणि हॅकिंगच्या घटना घडत आहेत.
या प्रकारात कोरोना व्हायरसच्या नावावर लोकांना ईमेल पाठवून हॅकर्स ऑनलाईन फ्रॉड करून लोकांकडून पैसे उकळत आहेत. Mimecast या सिक्युरिटी फर्मने असा एक फिशिंग ईमेल पकडला आहे. या ईमेलमधून थेट कोणत्याही पैशाची मागणी केली जात नाही तर समोरच्या व्यक्तीला अर्लट केलं जातं. आणि याच अर्लट नोटिफिकेशनमधून समोरचा व्यक्ती या फ्रॉडचा शिकार होतो.
या फ्रॉड फिशिंग ईमेलमध्ये तुम्हाला एक लिंक आणि pdf फाइल पाठवली जाते. त्यामध्ये कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी उपाय सांगण्याचा दावा केला जातो. हे हॅकर्स इतक्यावरच थांबलेले नाहीत तर, या खोट्या ईमेलसोबत World Health Organisation (WHO) या संस्थेचं पेज सुद्धा लिंक करण्यात आलेलं असतं. त्यामुळे या ईमेलची विश्वासार्हता वाढते आणि कुणीही या जाळ्यात अडकू शकतं.यामध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाते. जी ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी कन्फर्म करण्यासाठी सांगितला जातो. त्याचबरोबर तुमची इतर माहितीही भरण्यासाठी सांगितली जाते. तुम्ही जसजसे पुढे हा मेल वाचत जाता तसं एक लिंक दिली जाते ज्यामध्ये एक डॉक्युमेंट मिळतं. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोना व्हायरसवर उपाय सापडल्याचा चीनचा दावा, जाणून घ्या काय आहे तथ्य! )
(image credit- sales force)
या डॉक्युमेंटमध्ये कोरोनाव्हायरसपासून वाचण्याचा उपाय देण्याचा दावा केला जातो. त्यातच एक डाऊनलोड करण्याची लिंक आणि पर्यायही दिली जाते. त्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं अकाऊंट हॅक होतं. म्हणून या ऑनलाईन कोरोनाला बळी पडू नका आणि ऑनलाईन ईमेलच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवा. ( हे पण वाचा-गरोदर महिलांना कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवतील 'या' टिप्स)