सध्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस आणि बदलत्या आहाराच्या सवयींमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. आता तर फक्त वाढत्या वयातच नव्हे तर तरुण वयातच डायबिटीस होतो. डायबिटीस होण्यामागे जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव अशी बरीच कारणे असतात. या कारणांवर मात करण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीही उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशावेळी ओव्याचा तुम्हाला फार उपयोग होऊ शकतो. तो कसा करायचा हे जाणून घेऊ
ओव्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते तसेच यात अँटी ऑक्सिडंट व अँटी इन्फ्लेमेंटरी गुण असतात. याचा रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी फार फायदा होतो. त्यामुळे ओव्याचे सेवन डायबिटीस रुग्णांसाठी अत्यंत फायद्याचे आहे. तुम्ही जेवणानंतर ओव्याचे सेवन करु शकता. जाणून घेऊया ओव्याचे सेवन करण्याची योग्य वेळ व पद्धत
- तुम्ही जेवणानंतर थेट ओव्याचे सेवन करु शकता.
- तुम्ही ३ ग्रॅम ओवा १० मिली तीळाच्या तेलात मिसळून दिवसातून तीनदा त्याचे सेवन करु शकता.
- याशिवाय तुम्ही ओव्याची चहा पिऊ शकता. फक्त लक्षात ठेवा जेवणानंतर अर्ध्यातासाने या चहाचे सेवन करायचे आहे.