कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतात कोरोनातून बाहेर आलेल्यांची आकडेवारी समाधानकारक असली तरी कोरोनाची लागण होऊन मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा प्रत्येक रुग्णांवर होणारा परिणाम वेगवेगळा आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू होत असलेल्यांबाबत पाच कारण समोर येत आहेत. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (सीडीसी) नुसार मृतांमध्ये पुरूषांचा आकडा जास्त आहे.
५५ वयापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना धोका जास्त
ज्या लोकांचे वय ५५ पेक्षा अधिक आहे. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आणि कमकुवत असते. कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांवर आणि मेंदूवर परिणाम झाल्यामुळे मृत्यूचा सामना करावा लागतो.
पुरूषांना मृत्यूचा धोका जास्त
कोरोनामुळे पुरूषांचा मृत्यू जास्त प्रमाणात झाला आहे. इटलीमधील ५३ टक्के पुरूष संक्रमित झाले असून त्यांचा मृत्यूदर ६८ टक्के आहे. ग्रीसमध्ये ७२ टक्के आहे. तज्ज्ञांच्यामते कोरोना व्हायरसबाबत नसलेलं गांभिर्य आणि व्यसनाधिनता यामुळे मृतांमध्ये पुरूषांचे प्रमाण जास्त आहे.
आधीच आजार असलेल्या लोकांनी सावध राहायला हवं
इंपीरियल कॉलेज, लंडनचे श्वास रोगतज्ज्ञ प्रो. फॅन चुंग यांनी सांगितले की, ज्यांना फुफ्फुसांचे आजार, हृदयरोग, मधुमेह, लिव्हर आणि किडनी संबंधित आजार असलेल्या लोकांना कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो.
लठ्ठपणा
ब्रिटेनच्या नॅशनल हेल्थ सर्विस (एनएचएस) च्या रिपोर्टनुसार संक्रमित लोकांमध्ये दोन तृतीयांश लोक लठ्ठपणाचे शिकार होते. तसंच आयसीयूमध्ये भरती असलेल्या ६३ टक्के लोक लठ्ठपणाचे शिकार होते. त्याचं वजन सामान्यांपेक्षा जास्त होतं. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणं आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
रोगप्रतिराकशक्ती
शरीरातील रोगप्रतिराकशक्ती कमी असेल तर कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका जास्त असतो. अशी समस्या आजारी व्यक्तीसोबतच कॅन्सरग्रस्त, धुम्रपान करत असलेल्या लोकांमध्ये असतं. त्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हसिटीच्या सारा जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही गंभीर आजारापासून पिडीत असेलेल्या लोकांनी आपली औषधं वेळेवर घ्यायला हवीत. त्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. आपल्या जीवनशैलीत सुधारणा केल्यास कोरोनापासून बचाव करत येऊ शकतो.
CoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं
कोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन? समजून घ्या 'या' गोष्टी