Frequent Urinating Problem : आजकाल लोक वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. याची वेगवेगळी कारणे आहेत. बरेच लोक आजकाल पुन्हा पुन्हा लघवी येण्याच्या समस्येने सुद्धा हैराण असतात. पण ही समस्या कशामुळे होते हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. अशात आज ही समस्या कशामुळे होते याची कारणे आणि उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुन्हा पुन्हा लघवी येण्याची कारणे
पुरूषांना पुन्हा पुन्हा लघवी येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मात्र, याची काही मुख्य कारणे गंभीर आहेत. जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रोस्टेट
पुरूषांमध्ये ओव्हर अॅक्टिव ब्लॅडरसाठी म्हणजे पुन्हा पुन्हा लघवीसाठी प्रोस्टेट मुख्य कारण मानलं जातं. याला बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया असंही म्हटलं जातं. प्रोस्टेट ग्लॅंड यूरिनरी टॅक्टला कव्हर कते. जेव्हा हा ग्लॅंड मोठा होतो, तेव्हा लघवीचा फ्लो बाधित होतो. अशात लघवी करताना प्रेशर जाणवू शकतं. यानेच ओव्हर अॅक्टिव ब्लॅडरची समस्या होते.
नर्वस सिस्टीमची समस्या
तंत्रिका तंत्र म्हणजे नर्वस सिस्टीम प्रभावित करणाऱ्या स्थिती ओव्हर अॅक्टिव ब्लॅडरचं कारण ठरू शकतात. मल्टीपल स्केलेरोसिस आणि पार्किंसन्स व स्ट्रोकसारख्या समस्या ब्रेन आणि ब्लॅडरमधील कनेक्शन बाधित करतात. यामुळे लघवी करताना समस्या होऊ शकते.
डायबिटीस
डायबिटीसमध्ये व्यक्तीच्या ब्लॅडरला कंट्रोल करणाऱ्या नसांचं नुकसान होऊ शकतं. याने ओव्हर अॅक्टिव ब्लॅडरची लक्षणं जाणवतात. डायबिटीसच्या रूग्णांना यूरिनरी ट्रॅक्टशी संबंधित समस्या होऊ शकतात.
यूटीआय इन्फेक्शन
यूटीआय इन्फेक्शन ब्लॅडरमध्ये जळजळ होण्याचं कारण बनू शकतं आणि ओव्हर अॅक्टिव ब्लॅडरची लक्षणं निर्माण करू शकतं. यात पुन्हा पुन्हा लघवी येणे आणि लघवी करण्याची ईच्छा होणे यांचा समावेश आहे.
काय कराल उपाय?
पाणी स्वच्छ करताना फिल्टर-आरओ पाण्यातील अनेक मिनरल्सही काढून टाकतात. जे याच्या अवशोषणासाठी गरजेचे असतात. न्यूट्रिशनिस्ट रिद्धिमा बत्राने सांगितलं की, या मिनरल्सशिवाय पाणी प्यायल्याने पाण्याचा शरीराला हवा तो फायदा न मिळण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे पुन्हा पुन्हा लघवी येते. म्हणजे लघवीतून सगळे मिनरल्स बाहेर निघून जातात. अशात जाणून घेऊया पाणी पिण्याची योग्य पद्धत...
शरीरासाठी गरजेचे आहेत मिनरल्स
न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, आपल्या शरीराच्या सगळ्या मांसपेशी आणि नसांसाठी मिनरल्स व मीठ गरजेचं असतं. जे पाण्यात असतं. या मिनरल्सना इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं. ज्यांची नावं पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, क्लोराइड इत्यादी असतात.
इलेक्ट्रोलाइट कमी होण्याची कारणं
शरीरातून घामासोबत इलेक्ट्रोलाइटही निघून जातात. जेव्हा जास्त घाम निघतो तेव्हा यांची लेव्हल वेगाने कमी होते. हीट व्हेव, उष्ण वारा, एक्सरसाइज, तणाव आणि आजारांमुळे जास्त घाम जातो.
फिल्टर किंवा आरओच्या पाण्यात टाका या गोष्टी
समुद्री मीठ
लिंबाचा तुकडा
आल्याचा तुकडा
कलिंगडाचे तुकडे
नारळाच्या पाण्याचं करा सेवन
इलेक्ट्रोलाइट मिळवण्यासाठी नारळाच्या पाण्याचं सेवन करू शकता. यात काहीच मिक्स करण्याची गरज नाही. कारण यातच नैसर्गिक रूपाने आवश्यक ते मिनरल्स असतात.
पाण्यात कशा मिक्स कराल या गोष्टी
या गोष्टी पाण्यात मिक्स करण्यासाठी फिल्टर किंवा आरओचं पाणी एका मोठ्या जगामध्ये किंवा भांड्यात काढा. नंतर यात वर सांगण्यात आलेल्या गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट मिक्स करा. पाणी 2 ते 3 तास तसंच ठेवा. त्यानंतर त्याचं सेवन करा.