शहरं
Join us  
Trending Stories
1
वानखेडेवर भारतीय संघाचं 'ग्रँड सेलिब्रेशन', कोहली-रोहितचं 'इमोशनल स्पीच'! जाणून घ्या, कोण काय बोललं?
2
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
3
Fake T20 World Cup Trophy : व्हिक्ट्री परेडमध्ये रोहित शर्मा अँड कंपनीच्या हाती 'डुप्लिकेट' वर्ल्ड कप ट्रॉफी! पण का...? जाणून थक्क व्हाल
4
अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
5
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
6
जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
7
सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...
8
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
9
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
10
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
11
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
12
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
13
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
14
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
15
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
16
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
17
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
18
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
19
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
20
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार

हृदयक्रिया अचानक बंद पडण्याची कारणे? तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 5:58 PM

Heart Disease : हृदयविकारामुळे होणाऱ्या अनपेक्षित मृत्यूंच्या अशा वाढत्या घटना रोखण्यासाठी आता काटेकोर पावले उचलण्याची गरज आहे असे परखड मत डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांनी मांडले.

  डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप

Heart Disease : गेल्या मे महिन्यात दोन दुःखद घटना घडल्या. दोन प्रसिद्ध गायक आपल्यातुन निघून गेले. बॉलिवूडमधील गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) यांचे वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी निधन झाले. त्यांना अगोदरपासूनच हृदयविकार होता. एका संगीत रजनीच्या कार्यक्रमानंतर त्यांची हृदयक्रिया अचानक बंद पडली व त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे, ७८ वर्षे वयाचे मल्याळम पार्श्वगायक एडवा बशीर हेदेखील एका लाइव्ह कार्यक्रमादरम्यान कोसळले आणि निधन पावले. या दोन्ही घटनांनी हृदयद्रावक वळण घेतले आणि भारतीय नागरिकांमधील हृदयाचे आरोग्य कोणत्या स्थितीत आहे, यावर पुन्हा प्रकाश पडला. हृदयविकारामुळे होणाऱ्या अनपेक्षित मृत्यूंच्या अशा वाढत्या घटना रोखण्यासाठी आता काटेकोर पावले उचलण्याची गरज आहे असे परखड मत डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांनी मांडले. जाणून घेऊयात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा - हृदयाच्या आरोग्याची काळजी किती मोलाची आहे.

हृदयविकार ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो का?

सुमारे ७५ टक्के रुग्णांना आपल्या या आजाराची कल्पना नसते, परिणामी केवळ एक चतुर्थांश रुग्ण आपल्यात दिसून येणाऱ्या लक्षणांवर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेचे उपचार घेत राहतात.आज, ‘इस्केमिक हार्ट डिसीज’ सारखे हृदय व रक्तवाहिन्या संबंधीचे रोग (सीव्हीडी) आणि ‘स्ट्रोक’ सारखे ‘सेरेब्रोव्हॅस्क्युलर इव्हेंट्स’ ही जागतिक स्तरावर मृत्यूची प्रमुख कारणे बनली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जगभरातील या मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू भारतात होतात विशेषत: सर्वात चिंताजनक बाब अशी की हे सर्व भारतीय २० ते ४० वयोगटातील तरुण आहेत व तरुणांमध्ये त्यांचे प्रमाण वाढते आहे.

हृदयक्रिया अचानक बंद पडण्याची कारणे?

दीर्घ काळापासून असलेला ताणतणाव, उच्च उष्मांक असलेला व असंतुलित आहार आणि कमी शारीरिक हालचाली, तसेच इतरही अनेक घटक मृत्यूच्या घटनांच्या वाढीला कारणीभूत ठरत आहेत. ‘अपोलो हॉस्पिटल्स’ च्या ‘हेल्थ ऑफ द नेशन २०२२’ या एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, शहरी व निमशहरी भागांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण सुमारे ८ टक्के इतके आहे, तसेच लठ्ठपणाचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. हृदयविकाराच्या घटना वाढण्यास ही परिस्थितीच कारणीभूत आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या एका डेटाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे, की ५६ टक्के लोकांमध्ये किमान एका स्वरुपाचा तरी एनसीडी आहे, ४८ टक्के लोकांमध्ये उच्च पातळीवरील कोलेस्टेरॉल आहे आणि १९ टक्के कर्मचारी लठ्ठपणाने ग्रासलेले आहेत. उदा. कंबरेचा घेर, रक्तातील ग्लुकोज, हार्मोन्सची पातळी, रक्तदाब, कोलेस्टेरॉल हे महत्त्वाचे आणि कमी करता येण्याजोगे घटक जोखीम निर्माण करतात.

हृदयविकार प्रतिबंधक धोरणांमुळे टाळता येऊ शकतात का?

सकारात्मक बाजूने विचार केल्यास, हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या अकाली मृत्यूंपैकी ८० टक्के मृत्यू हे आरोग्याचे सक्रिय व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्यासाठीचे प्रतिबंधक धोरण यांमुळे टाळता येऊ शकतात. या जोखमीच्या घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण आरोग्य संवर्धन आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे. आरोग्यविषयक मूलभूत स्थिती समजून घेतल्याशिवाय, केवळ वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलेले निरोगीपणाचे पारंपरिक कार्यक्रम यापुढे पुरेसे ठरणार नाहीत. विविध चाचण्यांची आणि त्वरीत निदानाची मजबूत क्षमता उभारणे, त्याचबरोबर जनजागृतीचे उपक्रम राबविणे यातून या दिशेने काही भरीव कार्य होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास आणि त्याची जीवनशैली वेगवेगळी असते. त्यांचा सकारात्मक विचार करून एक प्रभावशाली कार्यक्रम तयार करणे, या व्यक्तींना विश्वासार्ह आरोग्य माहिती पुरविणे आणि स्वत:च्या आरोग्याची सक्रियपणे जबाबदारी घेण्यास त्यांना प्रोत्साहित करणे या गोष्टी करणे आवश्यक आहे.

आपत्कालीन परिस्थितीत काय कराल?

आपत्कालीन परिस्थितीत वेळ महत्वाचा असतो आणि रुग्णाने लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचणे महत्वाचे असते. सध्या ठिकठिकाणी ‘इमर्जन्सी कार्डियाक अॅम्ब्युलन्स’ सेवा मोफत उपलब्ध असते. रूग्णालयात नेण्यात येत असतानाही रुग्णावर तात्काळ स्वरुपात रूग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करता येतात. प्रत्येकाने या अशा रुग्णवाहिका सेवांचे फोन नंबर जवळ ठेवले पाहिजेत; जेणेकरून आणीबाणीच्या काळात ही सेवा मिळविणे सोपे होईल.

हृदयविकाराचा अनपेक्षित हल्ला होण्याची वाट पाहणे आता परवडणारे नाही. कारवाई करण्यापूर्वी लक्षणे दिसण्याची वाट पाहणे ही भूतकाळातील मानसिकता आहे. एक देश म्हणून आपण अधिक प्रतिबंधात्मक मानसिकतेकडे वळले पाहिजे आणि आपल्या आरोग्यामध्ये सक्रियपणे गुंतवणूक केली पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची आणि आपल्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेऊ, एकमेकांना मदत करू आणि एक निरोगी व आनंदी राष्ट्र होण्यासाठी एकमेकांना सक्षम करू या.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स