शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

थंडीत हातापायांना सुज येते का? जाणून घ्या त्यावरील घरगुती उपाय...सहज आणि सोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 6:39 PM

काही प्रभावी घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने तुम्ही शरीरातील सूज लवकर कमी करू शकता. मात्र, अधिक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. शरीरात सूज येण्याची अनेक (Home Remedies For Swelling) कारणं असू शकतात.

हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळं काही लोकांना शरीरावर सूज येण्याची (Body Swelling) समस्या होऊ शकते. शरीरात जळजळ होण्याची किंवा सूज येण्याची अनेक कारणं असू शकतात. अंगावर सूज आल्यानं लोक घाबरतात. मात्र, हा काही मोठा आजार नाही. हे किरकोळ आजाराचं लक्षणही असू शकतं. काही प्रभावी घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने तुम्ही शरीरातील सूज लवकर कमी करू शकता. मात्र, अधिक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. शरीरात सूज येण्याची अनेक (Home Remedies For Swelling) कारणं असू शकतात.

हृदयविकार, मूत्रपिंड समस्या (Kidney Problem), शरीरातील विविध स्रावांचं असंतुलन (Hormonal Imbalance) आणि स्टिरॉइड औषधांचा वापर यामुळं दाह होणं किंवा सूज येण्याची समस्या होऊ शकते. काही महिलांमध्ये मासिक पाळीच्या एक आठवडा आधी सूज येण्याची समस्या दिसून येते. याशिवाय, खराब जीवनशैली आणि आरोग्याला हानिकारक आहारामुळं सूज येण्याची समस्या होऊ शकते. सूज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ.

सूज दूर करण्यासाठी घरगुती उपाय

तुळसतुळशीच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचं सेवन केल्यास शरीरातील जळजळ, सूज दूर होण्यास मदत होते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. थंडीच्या मोसमात तुळशीचं सेवन केल्यानं सर्दी-पडशाला दूर ठेवता येतं.

हळदहळदीमध्ये अनेक अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळं जळजळ कमी होण्यास मदत होते. सूज दूर करण्यासाठी आहारात हळदीचा अवश्य समावेश करावा. तुम्ही हिवाळ्यात कच्च्या हळदीचंही सेवन करू शकता. झोपण्यापूर्वी तुम्ही हळद घालून दूधही पिऊ शकता.

जिरेशरीराची सूज कमी करण्यासाठी जिरे आणि साखर समान प्रमाणात बारीक करून एक चमचा दिवसातून तीन वेळा खाल्ल्यास सूज सहजपणे दूर होते. जिरे पोटाच्या समस्याही दूर करण्यास देखील मदत करतात.

ग्रीन टी ग्रीन टी हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ग्रीन टी आणि मधाचं सेवन करून जळजळ होण्याची समस्या दूर करता येते. याशिवाय, ग्रीन टी प्यायल्यानं वजन नियंत्रणात ठेवणंही सोपं जातं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी