वातावरण बदलामुळे सध्या वायरल तापाने सगळेजण हैराण आहेत. पण हा वायरल ताप दूर करण्यासाठी सतत अॅंटीबायोटीक खाल्यानेही साइड इफेक्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला वायरल इन्फेक्शनची लक्षणे दिसताच काही घरगुती उपायांनीही हा त्रास दूर करु शकता. वायरल ताप जास्तच असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
वातावरण बदलामुळे, खाण्या-पिण्यात बदल झाल्याने किंवा शारीरिक कमजोरीमुळे वायरल ताप येतो. वायरल ताप आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला कमजोर करतो. त्यामुळे शरीरात इन्फेक्शन वेगाने पसरतं. वायरलचं इन्फेक्शन वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं.
वायरल तापाची लक्षणे
वायरल ताप आला की, घशात दुखणे, खोकला, कोरडा खोकला, डोकेदुखी, थकवा, सांधेदुखी, उलटी, पोट बिघडणे, डोळे लाल होणे आणि कपाळ अधिक गरम होणे ही आहेत. मोठ्यांसोबतच वायरल ताप हा लहान मुलांमध्ये लगेच पसरतो. चला जाणून घेऊ यावर काही घरगुती उपाय...
१) हळद आणि आलं पावडर
आल्यामध्ये अॅंटीऑक्सिडेंट्सचे गुण असतात जे ताप कमी करण्यासाठी मदत करतात. एक चमचा काळ्या मिऱ्याचा चूर्ण, एक चमचा हळदीचं चूर्ण आणि एक चमचा सुंठ किंवाआल्याचं पावडर एक कप पाण्यात मिश्रित करा. हवी असल्यास त्यात थोडी साखर घाला. हे पाणी चांगलं उकळू द्या आणि थंड झाल्यावर त्याचं सेवन करा. याने वायरल ताप दूर होण्यास मदत होऊ शकते
२) तुळशीची पाने
तुळशीममध्ये अॅंटीबायोटिक गुण असतात. जे शरीरातील व्हायरस नष्ट करतात. एक चमचा लवंगेचं चूर्ण आणि दहा ते पंधरा तुळशीची पाने एक लिटर पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या. नंतर पाणी गाळून थंड झाल्यावर एका तासात प्यावे. याने वायरल ताप लगेच दूर होईल.
३) मेथीचं पाणी
मेथीचे दाणे एका कपामध्ये रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून प्यावे. याने लगेच आराम मिळेल.
४) लिंबू आणि मध
लिंबाचा रस आणि मध वायरल तापाचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. वायरल तापात मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन प्या. याने आराम मिळेल.