शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

'या' गंभीर आजारामुळे तुम्हाला येऊ शकत कायमच अंधत्व, वेळीच ओळखा लक्षणे अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 2:57 PM

टाइप 1 किंवा टाइप 2 डायबेटिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते. मधुमेह जितका जास्त असेल तितकी रक्तातील साखर अनियंत्रित होईल आणि रेटिनोपॅथी होण्याची शक्यता जास्त असेल.

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic retinopathy) ही मधुमेहामुळे (diabetes complication) डोळ्यांवर परिणाम करणारी एक समस्या (Eye Complication) आहे. हा त्रास डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या प्रकाशाला संवेदनशील पेशींच्या (light-sensitive tissue) रक्तवाहिन्यांना झालेल्या नुकसानामुळे होते. त्याला डोळयातील पडदा देखील म्हणतात.

सुरुवातीला, डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. तसंच दिसण्यासंबंधी समस्याही उद्भवत नाहीत. परंतु शेवटी, यामुळे माणसाला पूर्ण अंध्यत्व येऊ शकतं. टाइप 1 किंवा टाइप 2 डायबेटिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते. मधुमेह जितका जास्त असेल तितकी रक्तातील साखर अनियंत्रित होईल आणि रेटिनोपॅथी होण्याची शक्यता जास्त असेल.

डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला कदाचित लक्षणं दिसणार नाहीत, परंतु कालांतराने तुम्हाला काही लक्षणं जाणवू लागतील. ती अशी –- अस्पष्ट दिसणं (Blurred vision)- ठिपके दिसणं कधीकधी ते गडद रंगाच्या तरंगत्या तारांसारखे दिसतात. ते तुमची दृष्टी अस्पष्ट करतात.- अस्थिर दृष्टी (Fluctuating vision)- दृष्टी जाणं, ही काही लक्षणं तुम्हाला काही काळाने जाणवतील.

डायबेटिक रेटिनोपॅथीचे दोन प्रकार

अर्ली डायबेटिक रेटिनोपॅथी: डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सर्वात सामान्य प्रकाराला नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी (NPDR) म्हणतात. यामध्ये नवीन रक्तवाहिन्यांची वाढ थांबते. या स्थितीत, डोळ्यातील पडद्यामधील रक्तवाहिन्यां कमकुवत होतात आणि लहान रक्तवाहिन्यांमधून लहान फुगे बाहेर पडतात. काही वेळा, या रक्तवाहिन्यांमधून द्रव किंवा रक्तदेखील डोळ्यातील पडद्यांमध्ये गळते. अशा वाहिन्यांची संख्या वाढल्यानंतर नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात.

अ‍ॅडव्हान्स डायबेटिक रेटिनोपॅथीः डायबेटिक रेटिनोपॅथी गंभीर स्थितीत पोहोचल्यानंतर ती प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी (proliferative diabetic retinopathy) म्हणून ओळखली जाते. या स्थितीत, खराब झालेल्या रक्तवाहिन्या बंद होतात, ज्यामुळे डोळ्यातील पडद्यामध्ये नवीन, असामान्य रक्तवाहिन्यांची वाढ होते. ज्यामुळे तुमच्या डोळ्याच्या मध्यभागी भरलेल्या स्पष्ट, जेलीसारख्या पदार्थात पुढे गळती होऊ शकते. जर नवीन रक्तवाहिन्या डोळ्यातून द्रवपदार्थाच्या सामान्य प्रवाहात अडचणी आणत असतील तर त्यामुळे डोळ्यातील बुबुळावर खूप दबाव येऊ शकतो. परिणामी ऑप्टिक नर्व्हचे (optic nerve) नुकसान होऊ शकते. ही नर्व्ह तुमच्या डोळ्यातून तुमच्या मेंदूपर्यंत प्रतिमा घेऊन जाण्याचे काम करत असते, त्यामुळे तिचं नुकसान झाल्याचं त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

डायबेटिक रेटिनोपॅथी होण्यामागची महत्वाची कारणंदीर्घकाळ मधुमेह असणं, तुमच्या रक्तातील साखरेची नियंत्रण पातळी खराब असणं, उच्च रक्तदाबाचा त्रास असणं, हाय कोलेस्टेरॉल, गर्भधारणा, तंबाखूचं सेवन या गोष्टींमुळे डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचं प्रमाण वाढतं, असं तज्ज्ञ सांगतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह