शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

Mouth Cancer: अगदी सुरुवातीच्या स्टेजलाच ओळखा तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे, नाहीत होईल खुपच उशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 4:40 PM

जाणून घेऊया तोंडाच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि हा आजार टाळण्याच्या पद्धती किंवा उपाय.

माउथ, ओरल किंवा तोंडाचा कर्करोग हा पुरुषांमधील कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. तोंडाचा कर्करोग तोंडात कुठेही होऊ शकतो. बऱ्याचदा तो गाल आणि हिरड्यांमध्ये दिसून येतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, २०१९ मध्ये अंदाजे ५३ हजार अमेरिकन लोकांना ओरल किंवा ऑरोफरिन्जियल कॅन्सरचे निदान झाले.

डॉ. मुदित अग्रवाल, युनिट हेड आणि वरिष्ठ सल्लागार, राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर 'नवभारत टाईम्स'ला दिलेल्या माहितीत म्हणतात म्हणतात की तोंडाचा कर्करोग हा बरा होणारा आजार आहे. आपण काळजी घेतली तर याला आळा बसू शकतो. डॉक्टर सांगतात की भारतातील ७० टक्के लोक लास्ट स्टेजमध्ये डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. अशा परिस्थितीत उपचार खूप जास्त असतात आणि बरे होण्याची शक्यताही कमी असते. त्यामुळे त्याची लक्षणे वेळेत ओळखा आणि सुरुवातीच्या काळातच डॉक्टरांकडे जा. चला तर मग जाणून घेऊया तोंडाच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि हा आजार टाळण्याच्या पद्धती किंवा उपाय. (causes, symptoms, remedies of mouth cancer)

ओरल कॅन्सरची कारणेतोंडाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा शरीरातील अनुवांशिक बदलांमुळे पेशी नियंत्रणाशिवाय जास्त वाढतात. या पेशी जसजशा वाढतात तसतसे ते एक ट्यूमर तयार करतात. कालांतराने या पेशी शरीराच्या इतर भागातही पसरतात. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हा सुमारे 90 टक्के तोंडाच्या कर्करोगाचा स्रोत आहे.

ओरल कॅन्सरची लक्षणेडॉक्टरांच्या मते, तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाहीत. धूम्रपान करणारे आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांनी नियमितपणे दंतवैद्याकडे जावे. कारण तंबाखू आणि अल्कोहोल हे तोंडाच्या कर्करोगासाठी धोकादायक घटक आहेत. दंतचिकित्सक सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षणे शोधू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला असेल तर येथे नमूद केलेली लक्षणे लक्षात घेतली पाहिजेत.

  • तोंडाच्या किंवा जिभेच्या अस्तरावर डाग
  • तोंडात फोड येणे
  • हिरड्या मोठ्या किंवा जाड होणे
  • दात सैल पडणे
  • तोंडातून रक्त येणे
  • कानात वेदना होणे
  • जबड्यात सूज येणे
  • घसा खवखवणे
  • चघळण्यात किंवा गिळण्यात अडचण येणे
  • उघडे तोंड
  • तोंड न उघडणे
  • तोंडात सफेदपणा येणे
  • गळ्यात गाठ जाणवणे
  • तोंडात लाल डाग दिसणे

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास याचा अर्थ तुम्हाला तोंडाचा कर्करोगच आहे असे मुळीच नाही, पण तरीही तुम्ही डॉक्टरांना भेटून खात्री केली पाहिजे.

तोडांच्या कॅन्सरवरील उपचार

  1. शस्त्रक्रिया- डॉक्टर ट्यूमर आणि आजूबाजूच्या ऊतिकांची मार्जिन काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करू शकतात. या शस्त्रक्रियेत जीभेचा भाग आणि जबड्याचे हाड काढले जाते.
  2. रेडिएशन थेरपी- ही थेरपी तेव्हाच वापरली जाते जेव्हा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो.
  3. कीमोथेरपी- कीमोथेरपीमध्ये पॉवरफुल औषधे दिली जातात. ही औषधे कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात.

तोंडाच्या कॅन्सरचा धोका वाढवणारे घटक

  • धूम्रपान करणे किंवा तंबाखू चघळणे
  • नियमितपणे सुपारी खाणे
  • खूप दारू पिणे
  • मानवी पेपिलोमावायरस संसर्ग
  • डोके आणि मानेच्या कर्करोगाचा इतिहास
  • याव्यतिरिक्त गैस्ट्रोओसोफेगल रिफ्लक्स रोग, दीर्घकालीन जखमा किंवा सल्फ्यूरिक ऍसिड आणि फॉर्मल्डिहाइडच्या संपर्कात राहिल्यास तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. 

तोंडाच्या कॅन्सरपासून कसा करावा बचाव?

  • तोंडाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचा वापर टाळावा.
  • दारू पिऊ नका.
  • सुपारी चघळणे टाळा.
  • HPV पासून बचाव करण्यासाठी लसीकरण करा.
  • आकडेवारी दर्शवते की तोंडाच्या कर्करोगात एखाद्या व्यक्तीला किमान 5 वर्षे जगण्याची सरासरी शक्यता असते. डॉक्टर म्हणतात की तोंडाचा कर्करोग बरा होऊ शकतो जर तुम्ही लक्षणे ओळखून सुरुवातीच्या टप्प्यामध्येच डॉक्टरांकडे गेलात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोग