नवी दिल्ली : गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर स्वदेशात प्रथमच बनविलेली सर्व्हावॅक ही ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रकारची लस येत्या काही महिन्यांत सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. या लसीची किंमत लोकांच्या खिशाला परवडेल अशी म्हणजे २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान असणार आहे.सर्व्हावॅक लस बनविण्यासाठीचे संशोधन व विकास प्रक्रिया आता पू्र्ण झाली आहे. ही घोषणा गुरुवारी एका कार्यक्रमात करण्यात आली.
२०२० साली जगामध्ये ६.४ लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता.३.४२ लाख महिलांचा २०२० मध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाने मृत्यू१ लाख महिलांना भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग व काही हजार रुग्णांचा मृत्यू.१५ ते ४४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्कराेगाचे प्रमाण जास्त आहे.
२० कोटी डोस तयार करणारसर्व्हावॅक लसीचे पहिल्या टप्प्यात २० कोटी डोस तयार करण्याची योजना आहे. सर्वप्रथम या लसीचा वापर देशात केला जाईल. त्यानंतर ती अन्य देशांमध्ये निर्यात केली जाईल, अशी माहिती केंद्रीय जैवतंत्रज्ञान खात्याचे सचिव राजेश गोखले यांनी दिली.