पुणे : रक्तगटानुसार आहार घेतल्यास तुमच्या आराेग्यासाठी फायदेशीर ठरु शकताे. रक्तगटानुसार आहार घेतल्यास जेवणाचे चांगले पचन हाेते. तसेच आपले वजनही कमी केले जाऊ शकते. अशा आहारामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि आपण राेगांपासून वाचताे.
आपला रक्तगट हा आपल्या आराेग्याचा आणि आपल्या तंदुरुस्तीचा मुख्य फॅक्टर असताे हे अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. ए, बी, एबी आणि निगेटिव्ह आणि पाॅझेटिव्ह हे उपप्रकार मिळून आठ प्रकारचे रक्तगट असतात. रक्तगटानुसार घेतलेल्या आहारामुळे अन्नाचे याेग्य पचन हाेते. तसेच आपल्याला उर्जा मिळते. काही लोकांचे शरीर सहज वजन कमी करू शकते, तर काहींना वजन कमी करायला खूप कसरत घ्यावी लागते. काही लोकांना जुने आजार वारंवार होतात. काही लोक मात्र खूप तंदुरुस्त असतात. ब्लड ग्रुपनुसार काही लोकांचा मुड कायम बदलत असतो तसेच स्वभावातही चढ-उतार होत असतो. रक्तगटामुळे प्रत्येक व्यक्ती वेगळी ठरत असते. रक्तगटानुसार आहार घेतल्यास अनुवांशिक राेगांवर नियंत्रण मिळण्यासही मदत हाेते. किडनी संबंधी आजार, काेलेस्टेराॅल, हायपरटेंशन आदींमध्ये ते फायदेशीर ठरते.
'ए' रक्तगट'ए रक्तगटाच्या व्यक्तीने आहारात तांदूळ, ओट्स, माेहरी, पास्ता, काशीफळाच्या बिया, अंजिर, शेंगदाणे, लिंबू, बेदाणे, मनुखा, मेथी खाने फायदेशीर आहे. गव्हाची चपातीही या रक्तगटाच्या लाेकांसाठी फायदेशीर ठरते. शक्यताे या रक्तगटाच्या लाेकांनी मांसाहार टाळावा. गहू, ब्राउन राइस, पास्ता, पोहे, सोयाबीन, बेसनाच्या वड्या खाने फायदेशीर आहे.
'बी' रक्तगटबी रक्तगट असलेल्या लाेकांनी पालेभाज्या, अंडी, कमी फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ घ्यायला हवेत. ऑनिमल प्राेटीन, ओट्स, दुधाचे पदार्थ या रक्तगटासाटी चांगले आहे. गहु या रक्तगटाच्या लाेकांना फारसा फायदेशीर ठरत नाही. ओट्स, प्रॉन्स, पनीर, अंडे, यांच्यासाठी चांगले आहे. 'एबी' रक्तगटया रक्तगटाच्या लाेकांसाठी दही, बकरीचे दूध, अंडे, बाजरी, ओट्स, मोहरी, गेहू, मोड आलेले गहू, ब्रोकली, पत्ताकोबी, बीट,काकडी, आलूबुखारा, बेरी खाने जास्त फायदेशीर आहे. डाळभात, डाळपोळी, दलिया खिचडी, ब्राउन राइस, पुलाव हे सुद्धा फायदेशीर आहेत. तसेच अक्राेड खाने सुद्धा या लाेकांसाठी फायदेशीर आहे.
'ओ' रक्तगटसॅंडविच, ढाेकळा, डाेसा, इडली, उत्तप खाने या रक्तगटाच्या लाेकांसाठी फायदेशीर ठरते. तसेच कोबी, सलाद, ब्रोकली, कांदा, काशीफळ, लाल मिरची, भेंडी, लसूण, अद्रक, चेरी, अंजीर, आलूबुखारा, रासबेरी, क्रेनबेरी, गूसबेरी, प्रोटीन, चीजयुक्त पदार्थ जास्त फायदेशीर असतात.