काळे चणे हे आपल्या रोजच्या आहारात असलेच पाहिजेत. काळे चणे तुम्ही उकडून त्याची भाजी करून खाऊ शकता. तुम्ही ते चणे उकडून त्याच टॉमेटो, कांदा, कोथिंबीर आणि चाट मसाला टाकून खाऊ शकता. डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी झी न्युज हिंदीला काळे चणे खायचे फायदे सांगितले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा मधुमेह म्हणजेच डायबिटीसच्या रुग्णांना मिळतो.
डायबिटीसच्या रुग्णांना काळे चणे फायदेशीरचण्यात कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन आणि व्हिटॅमिन्स असताता त्यामुळे चण्याचे सेवन डायबिटीस कंट्रोल करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. या शिवाय चण्यात अँटीऑक्सीडंट्स पण भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रित राहते.
कसे खावेत चणे?तुम्ही एक मुठभर काळे चणे खाऊ शकता. तुम्हाला चणे खायचे नसतील तर एक मुठभर चणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी प्यायल्याने भरपूर फायदा होतो.
चण्याचे इतर फायदेकाळ्या चण्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे पचनक्रियेसाठी खूपच फायदेशीर असतं. रात्रभर चणे पाण्यात भिजवून ठेवून ते खाल्ल्यास बद्धकोष्ठाची समस्या दूर होते. तसंच चणे भिजवलेलं पाणी फेकून न देता ते प्यायल्यासही फायदा होतो. जर तुम्ही अॅनिमिक असाल तर चणे खाण्याची सवय करून घ्या. कारण हे त्यांच्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी चण्यांचं सेवन खूपच चांगलं असतं. कारण चणे हा लोह सत्त्वाचा खूप चांगला स्त्रोत आहे. तसंच चण्याचं पाणी हे चेहऱ्यासाठीही उत्तम आहे. चणे भिजवलेल्या पाण्याने तुम्ही चेहरा धुतल्यास तो उजळतो.