Health Tips : कोलेस्टेरॉल शरीरात आढळणारी एक प्रकारची चरबी आहे, जी अनेक हार्मोन्स बनवते आणि कॅल्शियमही शोषते. कोलेस्टेरॉल शरीरात टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन हार्मोन्ससह अनेक हार्मोन्स तयार करते. कोलेस्टेरॉल यकृत आणि आतड्याच्या योग्य कार्यासाठी रसायन तयार करते. शरीरात एवढी महत्त्वाची कार्ये पार पाडत असतानाही, कोलेस्टेरॉलला वाईट म्हटले जाते.
कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय -
सायकल चालवणे, व्यायाम करणे, आहारात क्विनोआ, चणे, राजमा, बदाम, ब्रोकोली आदी पदार्थ खाऊ शकता. हेल्दी पदार्थ खाण्यावर भर द्यावा, भाज्या, मासे, चिकन, अंडी यांचे सेवन करावे. संतुलित आहार व नियमित व्यायामामुळे कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येते. तसेच धूम्रपान व मद्य सेवन टाळावे. डॉ. बेयस संघवी, एम.बी.बी.एस.
कोलेस्टेरॉल पातळी किती; तपासणी कधी कराल?
• कोलेस्टेरॉल पातळी वाढल्याने रक्त्ताभिसरण धमन्या अरुंद होऊ लागतात. परिणामी, हृदयाला शरीरातून रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. अशा स्थितीला उच्च रक्तदाब म्हणतात, हेदेखील हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत तरते.
• कोलेस्टेरॉल हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. उच्च घनतेच्या कोलेस्टेरॉलला एचडीएल आणि कमी धनतेच्या कोलेस्ट्रॉलला एलडीएल म्हणतात.
• कोलेस्टेरॉल हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात.
• एचडीएलला चांगले कोलेस्टेरॉल म्हटले जाते, रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले जास्तीचे कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ मदत करते.
•एलडीएलला वाईट कोलेस्टेरॉल म्हणतात, कारण, ते हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा करते. शरीरात एलडीएलची (LDL) पातळी वाढलेली असेल, तर तो हृदयविकाराच्या रुग्णांनी धोक्याचा इशारा समजावा आणि तातडीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू करावेत.
• यामुळे धमन्या अरुंद होऊ लागतात. परिणामी, हृदयाला शरीरातून रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. अशा स्थितीला उच्च रक्तदाब म्हणतात, हेदेखील हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरते.