शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

Health tips: अन्न ३२ वेळा चावलं पाहिजे पण पाणी पिण्याचे नियम काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 6:31 PM

अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अन्न घाई-गडबडीत कधीही खाऊ नये, असे आपल्याला वडीलधारी माणसं लहानपणापासून सांगत आली आहेत. अन्न नीट चावले पाहिजे, ते लगेच गिळू नये आणि न चावता थेट पोटात जाऊ देऊ नये. तुम्ही असंही ऐकलं असेल की अन्न किमान ३२ वेळा चावलं पाहिजे. असंच काहीसं पाण्याच्याबाबतीतही सुचवलं जातं, ते म्हणजे पाणी थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि (Drink Your Food, Chew Water) हळू हळू गिळा.

अनेकवेळा तुमच्या मनात प्रश्न येईल की, शेवटी अन्न चावून खाण्यास का सांगितले जाते? यामागचे कारण काय आणि असे केल्याने शरीराला काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे देताना दैनिक भास्कर वृत्तपत्रानं तज्ज्ञांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. (Drink Your Food, Chew Water). या अहवालात, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण संशोधक डॉ. सुभाषश्री रे (Dr. Subhasree Ray) लिहितात की, अन्नाचं पचन तोंडापासून सुरू होतं. अन्न चघळल्यानं तोंडात तयार होणारी लाळ अन्नाला मऊ करते आणि शरीराला आवश्यक हार्मोन्स सोडण्यास पुरेसा वेळ मिळतो. अन्न पचवण्यासाठी, ते शक्य तितकं आतड्याच्या संपर्कात येणं आवश्यक आहे. पाणी पितानाही गटागट एकमद पोटात घेणं चुकीचं आहे. पाणी पिताना शांतपणे घोट-घोट घ्यायला हवे. अशा पद्धतीनं प्यायलेल्या पाण्याचा शरीराला अधिक फायदा होतो.

अन्न जितकं जास्त चघळलं जाईल, तितकं ते आतड्यांच्या संपर्कात येईल, बारीक होईल, असे डॉ. सुभाषश्री सांगतात. त्यामुळं अन्न पचवणारे एन्झाइम्स त्यात पुरेशा प्रमाणात मिसळू शकतील. याशिवाय चघळल्याशिवाय किंवा कमी चघळल्याशिवाय जास्त खाण्याची शक्यता खूप वाढते. असंही घडतं की खूप लवकर-लवकर खाल्ल्यानंतर मेंदूला उशीरानं पोट भरण्याचे संकेत मिळतात. त्यामुळं अन्न भुकेपेक्षा जास्त खाल्लं जाऊन आपल्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा वाढतो. तर, अन्न चघळण्याचे आणि खाण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊ.

लठ्ठपणा आणि वजन कमी होणेभूक आणि शरीरातील कॅलरीजचं प्रमाण प्रामुख्यानं हार्मोन्सद्वारे नियंत्रित केलं जातं. जेवणानंतर आतड्यात घ्रेलिन (Ghrelin) नावाचं हार्मोन कमी होतं. हे हार्मोन भूक नियंत्रित करतं. यासोबतच जेवणानंतर आतडं अशी हार्मोन्स सोडतात, ज्यामुळे पोट भरल्याची भावना येते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे २० मिनिटं लागतात. एवढंच नाही तर अन्न चघळल्यानं तुमचा खाण्याचा वेग कमी होतो, ज्यामुळं शरीरातील कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. याचा परिणाम म्हणजे स्थूलपणा कमी होतो. कारण, शरीराला आवश्यक तेवढ्याच कॅलरीज मिळतात.

भूक कमी असेल तर पोषण कसं मिळणार?'द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'च्या (The American Journal of Clinical Nutrition) संशोधनानुसार, जेव्हा अन्न पुरेसं चघळलं जातं, तेव्हा ते अगदी लहान तुकड्यांमध्ये बदलते. जे गिळल्यावर घशावर पडणारा ताण कमी होतो. तसंच, जेव्हा हे कण आतड्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा एन्झाईम्स त्यांत सहजपणे विरघळतात. ज्यामुळं पोषण अधिक प्रमाणात तयार होतं आणि शरीरात वेगानं शोषलं जातं. यामुळं कमी अन्न खाऊनही शरीराला अधिक पोषण आणि प्रथिनं मिळतात.

अन्न-पाणी घाईत खाण्याचे तोटेनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही अन्न योग्य प्रमाणात चघळत नाही आणि पाणी वेगात पिता तेव्हा पचनसंस्थेमध्ये गोंधळ होतो. शरीरात एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. त्यामुळं पोट फुगणं, जुलाब, छातीत जळजळ आणि जास्त प्रमाणात ऍसिड तयार होणं, पोटदुखी, नाकातून पाणी येणं, डोकेदुखी, चिडचिड, कुपोषण, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स