च्युईंगम हे शरीरासाठी किती नुकसानकारक आहे याबाबत तुम्ही अनेकदा वाचलं असेल. पण च्युईंगमचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अनेकांना च्युईंगम खाण्याची सवय चुकीची वाटते, पण आता याचे फायदेही समोर आले आहेत. शरीराला काही व्हिटॅमिन्स देण्यास च्युईंगम प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. वैज्ञानिकांनी सांगितलं आहे की, ही सवय जगभरात व्हिटॅमिनची कमतरता असण्याची गंभीर समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.
व्हिटॅमिनची कमतरता होते दूर
पहिल्यांदाच संशोधकांनी च्युईंगमच्या माध्यमातून शरीरात व्हिटॅमिन पोहोचण्यावर अभ्यास केला. अमेरिकेतील पेन्सिलवेनिय स्टेट यूनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक जोशुआ लॅम्बर्ट म्हणाले की, 'मी हा विचार करुन हैराण आहे की, बाजारात च्युईंगमची इतकी उप्तादने असूनही कुणी यावर आधी का अभ्यास केला नाही. पौष्टिक च्युईंगम हे पूरक आहार श्रेणीमध्ये येतात त्यामुळे त्यांच्या प्रभावांचा अभ्यास करण्याची गरज नाहीये'. शरीरात व्हिटॅमिन पोहोचवण्याच च्युईंगमची भूमिका याबाबत जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १५ लोकांना च्युईंगम दिले आणि त्यांच्या लाळेतील आठ व्हिटॅमिनचं प्रमाण मोजण्यात आलं.
च्युईंगम खाण्याचे फायदे
१) स्मरणशक्ती वाढवण्यास फायदेशीर
जेव्हा तुम्ही च्युईंगम खाता तेव्हा हिप्पोकॅम्पस अधिक सक्रिय होतो. हिप्पोकॅम्पस हा भाग स्मरणशक्तीबाबत महत्त्वाची भूमिका बजावतो. स्मरणशक्ती वाढवण्यासोबतच च्युईंगममुळे मेंदुमध्ये रक्तप्रवाह वाढण्यासही मदत मिळते. जेव्हा तुम्ही च्युईंगम खाता तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात आणि मेंदुला अधिक ऑक्सिजन मिळतं.
२) चिंता आणि तणाव दूर करण्यास मदत
च्युईंगम तणाव आणि चिंता दूर करण्यासही मदत करतो. रिसर्चमधून समोर आले की, ज्या लहान मुलांनी परिक्षेदरम्यान च्युईंगम खाल्लं ते अधिक सजग होते. च्युईंगम खाल्याने केवळ तणावच दूर होतो असे नाही तर याने तुम्ही चिडचिडपणाही कमी होतो. याने तुम्हाला रिलॅक्स वाटू शकतं.
३) वजन होतं कमी
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी च्युईंगम फायदेशीर ठरु शकतं. जेव्हा तुमचं मन स्नॅक्स किंवा काही गोड खाण्याचं झालं तर च्युईंगम खा, कारण यात सर्वात कमी कॅलरी असतात. त्यामुळे हेच तुमच्यासाठी योग्य स्नॅक्स ठरु शकतं आणि याने तुमच्या डाएटलाही नुकसान होणार नाही.