(Image Credit : WeForNews)
च्युईंगम खाण्याची सवय तरूणाईमध्ये अधिक बघायला मिळते. कुणी स्टेटससाठी च्युईंगम खातात, तर कुणी सिगारेट ओढल्यावर दुर्गंधी येऊ नये म्हणूण तर लहान मुले गंमत म्हणूण च्युईंगम खातात. तुम्हालाही च्युइंगम खाण्याची आवड असेल आणि तुम्ही व्हाइट कलरचा मेयोनीज खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण यात असलेल्या पदार्थांमुळे तुम्हाला कोलोरेक्टल कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो.
फूड अॅडिटिव्हमुळे कॅन्सरचा धोका
(Image Credit : The Sun)
खाद्य पदार्थांमधील रूप, रंग, गंध आणि इतरही काही गुण सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी जे पदार्थ वापरले जातात त्यांना फूड अॅडिटिव्ह म्हटलं जातं. च्युईंगम किंवा मेयोनीजसारख्या पदार्थांमध्ये व्हायटनिंग एजन्ट म्हणूण सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या फूड अॅडिटिव्हमुळे पोटात जळजळ होण्याची समस्या आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे.
व्हायटनिंग एजन्ट म्हणूण वापर
E171 ज्याला टायटेनियम डायऑक्साइड नॅनोपार्टिकल्स म्हटलं जातं, हे एक फूड अॅडिटिव्ह आहे. ज्याला वापर व्हायटनिंग एजन्ट म्हणूण मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तसेच औषधांमध्ये केला जातो. या फूड अॅडिटिव्हचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी एक रिसर्च करण्यात आला. E171 चा वापर ९०० पेक्षा अधिक फूड प्रॉडक्टमध्ये केला जातो. सामान्यपणे लोक मोठ्या प्रमाणात फूड अॅडिटिव्हच्या पदार्थांचं सेवन करतात.
आतड्यांवर पडतो वाईट प्रभाव
फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, E171 फूड अडिटिव्ह असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने थेट आपल्या आतड्यांवर वाईट प्रभाव पडतो, ज्यामुळे पोटाशी संबंधित वेगवेगळ्या समस्या होतात आणि कोलोरेक्टल कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याचाही धोका असतो. तरी सुद्धा फूड अॅडिटिव्हचा आपल्या आरोग्यावर काय प्रभाव पडतो, याबाबत फार जास्त माहिती उपलब्ध नाही.