(Image Credit : www.orcharddentalpractice.co.uk)
दातांची समस्या भारतात एक गंभीर समस्या म्हणून समोर येत आहे. अलिकडे जंकफूडच्या क्रेझ अधिक वाढली असल्याने शाळेत जाणाऱ्या लहान मुलांमध्ये दातांशी निगडीत समस्या वाढत आहेत. दंत क्षय म्हणजेच डेंटल कॅरीज दातांच्या इनॅमलवर अॅसिडच्या वापराने होतो. अॅसिड तेव्हा निर्माण होतं जेव्हा दातांमध्ये अडकून बसलेला बॅक्टेरिया किंवा पेय पदार्थातील शुगर क्रिया करते. हे अॅसिड इनॅमलमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फेट कमी होण्याचं कारण बनतात.
हृदयासंबंधी आजार होऊ शकतो
हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. के.के. अग्रवाल यांनी नवभारत टाईम्सला सांगितले की, 'भारतीय लोक तोंडाच्या स्वच्छतेच्या बाबतीत फार निष्काळजी असतात. खराब दातांमुळे हृदय रोगसहीत इतरही दुसरे आजार होऊ शकतात. आजची लहान मुले आपल्या खाण्यांच्या बदलत्या सवयींमुळे दंतक्षयाने ग्रस्त आहेत. कॅलरी असलेले पदार्थ जसे की, बिस्कीट, चॉकलेट आणि इतर प्रोसेस्ड फूडमध्ये साखर आणि मीठ दोन्ही जास्त असतात. याने तोंडाची समस्या निर्माण होतात'.
योग्य वेळेवर उपाय गरजेचा
डॉक्टरांनी सांगितले की, 'तोडांतील बॅक्टेरिया तोंडात अॅसिड निर्माण करतात आणि जे दातांवर छोटी छोटी छिद्र करतात. हा दंत क्षयाचा पहिला टप्पा आहे. योग्यवेळी यावर उपाय न केल्यास दातांमध्ये अॅसिड जाऊन दात आतून नष्ट होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांना आधीच दातांच्या स्वच्छतेची सवय लावली पाहिजे. जंक फूडपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे.
दातांची काळजी कशी घ्याल?
1) ब्रश नियमीत करा. याने बॅक्टेरियाची निर्मिती होणे थांबवता येते.
२) दररोज गुरळा करा. याने त्या जागांची स्वच्छता होते जिथे ब्रश पोहोचू शकत नाही.
३) शुगर आणि स्टार्चयुक्त पदार्थांपासून दूर रहा. याने दातांमध्ये बॅक्टेरिया अधिक निर्माण होतो.
४) जिभ सुद्धा बॅक्टेरियाला एकत्र करते. त्यामुळे ब्रश करताना जिभ स्वच्छ करणे गरजेचे आहे.
५) जर तुमच्या हिरड्यांमध्ये सूज येत असेल आणि त्यातून रक्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्या. याकडे दुर्लक्ष करु नका.
६) दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करा.