शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मुलांच्या परीक्षा सुरू होणार; आहार, अभ्यासाचे 'असे' करा नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 12:31 PM

परीक्षेच्या काळात आरोग्य, मन संतुलित ठेवण्याची गरज.

Health Tips : परीक्षेच्या काळात ताणतणावांचा सामना करण्याबरोबरच हवाबदलालाही विद्यार्थी सामोरे जात असतात. याकाळात सारखी तहान लागते. परीक्षेच्या टेन्शनमुळे भूकही लागत राहते. अशावेळी कम्फर्ट फूड म्हणजे पिझ्झा, नूडल्स, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक हे पदार्थ खाण्याची इच्छा बळावते. परंतु, परीक्षेच्या काळात आरोग्य जपण्याबरोबरच आळस झटकून अभ्यासाला लागायचे असेल आहाराचा भर घरच्या जेवणावर हवा, असे आहारतज्ज्ञ आणि होमिओपॅथी डॉ. वैशाली जोशी सांगतात. 

कार्बोहायर्डेट, प्रोटिन, मिनरल्स, फॅट, विटॅमिन आणि पाणी यांचे संतुलन ठेवणारा आहार या काळात घ्यावा. मैद्यासारखे रिफाईंड अन्नपदार्थऐवजी पोळी,  भाकरी यांना प्राधान्य द्यावे.  प्रोटिनचा स्त्रोत असलेला डोसा, मोड आलेली कडधान्ये, अंडी, दूध, पनीर, दही,  या काळात उत्तम आहे. 

अभ्यासाबरोबरच हेही कराच? 

सकस आहार, पुरेशी विश्रांती, सात ते आठ तास झोप आणि किमान एक तास व्यायाम हा नित्यक्रम असायला हवा. पुरेशी विश्रांती नसेल तर अशक्तपणा जाणवतो. व झोप अपुरी असेल तर उष्णता साठून राहिल्याने तोंड येण्यासारखे आजार होतात.

काय खावे ?

 मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, लिंबू, संत्रे, आवळा, किवी, मोसंबी इत्यादीरताळे, गाजर, भोपळा, पपई, आंबा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थपालक, बदाम, शेंगदाणे, मासे इ.

  कॅल्शियम - पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खसखस, राजगिरा, राजमा,मासे, कडधान्ये, नाचणी, कुळीथ इ. 

 पालेभाज्या, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ, अंडे, कडधान्ये, धान्ये, फळभाज्या, मांसाहारी पदार्थ, मासे इत्यादी

जीवनसत्त्वे -  मॅग्नेशिअम - कडधान्ये, काजू, बदाम, आंबा, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ.  पोटॅशिअम - चिकू, फणस, जरदाळू, मोसंबी इ.

हे टाळा :

कोल्ड्रिंक, तळलेले पदार्थ, पिझ्झा, नूडल्स, चिप्स, चॉकलेट्स, कुकीज, बर्गरसारखे फास्टफूड टाळणे खूप गरजेचे असते. या पदार्थांमध्ये पोषणमूल्ये नसतात. त्यातून प्रतिकारकशक्ती वाढत नाही. खूप जास्त कार्बोहायर्डेट, फॅट असलेले पदार्थही जेवणात नसावे. 

खाण्याच्या वेळा पाळा :

परीक्षेच्या दिवशी तीन-चार तास ऊर्जा मिळेल, असे सकस अन्न खावे. परीक्षा बरेचदा सकाळच्या वेळी असते. त्यामुळे सकाळची न्याहारी चांगली करायला हवी. 

दुपारचे, रात्रीचे जेवण वेळेत घ्यावे. मधल्या वेळेत काही खावेसे वाटले तर सूप, सलाड, राजगिऱ्याचा लाडू, फळे, पोहे, उपमा, चणे-शेंगदाणे, व्हेज, भाज्या घालून केलेली फ्रॅंकी, पनीर सॅण्डवीच, इडली डोसा, डाळींचे आप्पे इत्यादी पर्याय आहेत

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सStudentविद्यार्थीexamपरीक्षा