चीनमध्ये चांगल्या क्वालिटी स्पर्म डोनरची मागणी वाढली आहे. एका स्पर्म बँकेने सोशल मीडियावरून लोकांना पुढे येऊन स्पर्म डोनेट करण्याचं आवाहन केलं आहे. चांगल्या क्वालिटीचं स्पर्म देणाऱ्या पुरुषांना मोठी रक्कमही देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. झेजियांग ह्यूमन स्पर्म बँक मागील काही वर्षापासून डोनर्सला स्पर्म डोनेट करण्यासाठी आवाहन करत आहे.
स्पर्म डोनेट करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी जाहिरातींचाही आधार घेतला जात आहे. स्पर्म बँकेने एका पोस्टमध्ये लिहिलंय की, तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. तुमचं समर्पण भविष्यासाठी फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला सार्वजिनक सेवा करणे आणि स्पर्म डोनेट करण्यासाठी आमंत्रित करतो. त्यापूर्वी स्पर्म बँकेने लिहिलं होतं की, स्पर्म डोनेट करणं म्हणजे रक्तदान करण्यासारखं आहे. हे माणुसकीच्या नात्याने केले गेलेले काम आहे. चांगल्या क्वालिटीचं स्पर्म शोधण्यासाठी आम्ही ५ हजार युआन(५६ हजार रुपये) देऊ. तर तुम्ही वाट कसली बघताय? असं विचारण्यात आलं आहे.
दरम्यान सोशल मीडियावर स्पर्म बँकच्या या पोस्टवर अनेकांनी जोक्स बनवले आहेत. एका यूजरने म्हटलं, मला डोळ्यांनी कमी दिसते आणि मी वृद्ध झालो आहे. मी त्यासाठी पात्र ठरणार नाही असं मला वाटतं. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, जर मी इतकं स्पर्म डोनेट केले तर देशभरात माझी कित्येक मुलं फिरतील त्याची मलाच माहिती नसेल. चीनमध्ये सध्या स्पर्म बँकेचे स्थिती बरोबर नाही. झेजियांग ह्यूमन स्पर्म बँकेचे संचालक शेंग हुईकियांग यांनी एका वृतपत्राला सांगितले की, स्पर्म बँकेला मागील काही वर्षापासून तुटवडा भासत आहे. आम्ही अनेकांनी स्पर्म डोनेट करण्यासाठी संपर्क करतो, परंतु अनेक लोक त्यासाठी पात्र ठरत नाही.
चीनमध्ये स्पर्म डोनेट करण्याचे कडक नियम आहेत. शेंग म्हणतात की, यावेळी १५०० डोनर्समधून केवळ ४०० लोक पात्र ठरतात. सिगारेट, दारू पिणे, रात्री उशीरा जागणे आणि व्यायाम न केल्याने अनेकांचे स्पर्म क्वालिटी खराब होत आहे. झेजियांग ह्यूमन स्पर्म बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्पर्म डोनरचं वय २० ते ४० दरम्यान असावं. कमीत कमी पोस्ट सेकंडरी डिग्री असायला हवी आणि कमीत कमी ५.४ फूट उंची असायला हवी. मागील काही वर्षापासून स्पर्म बँकेने केस नसलेल्या लोकांचे स्पर्म घेणं बंद केले आहे. स्पर्म डोनेटर निवडण्याआधी अनेक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. ज्यात डोनर सुंदर आणि हँडसमदेखील हवा आहे.