चीनचा फोल्डिंग मॅन या नावाने ओळखल्या जात असलेल्या व्यक्तीला तब्बल २८ वर्षांनंतर जीवनदान मिळाले आहे. आता हा व्यक्ती उभा राहू शकतो. या व्यक्तीचे नाव ली असे आहे. १९९१ मध्ये जेव्हा तो व्यक्ती १८ वर्षांचा होता. त्यावेळी एंकिलॉजिंग स्पॉन्डिलाइटिस नावाचा आजार झाला. या आजारामुळे त्यांची कबंर वाकलेली असायची आणि या व्यक्तीचा चेहरा हा त्याच्या मांड्यांना चिकटलेला होता.
माध्यमांच्या माहीतीनुसार हुनान प्रांतातील योंगझोऊ या ठिकाणी राहत असलेल्या ४६ वर्षीय ली या माणसाकडे त्यावेळी स्वतःचा उपचार करण्याइतके पैसे नव्हते. तो त्याच्या आई सोबत राहून आपले दिवस काढत होता. जेव्हा पाच वर्षापूर्वी ली याची कंबर जास्त खाली वाकली त्यावेळी तो शेन्जेन युनिव्हरसिटीतील जनरल हॉस्पिटलच्या स्पायनल सर्जन विभागाचे टीम लीडर प्रोफेसर ताओ हुईेरेन यांना भेटला.
डॉक्टर ताओ हुईरेन यांनी ली ची ४ वेळा सर्जरी केली. याचा सकारात्मक परीणाम होऊन आता ली हे स्वतःच्या पायावर उभे आहेत. ली यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी ३ महिेने लागतील असं डॉक्टरांच मत आहे. ताओ हुईरेन यांनी ली यांचा उपचार केल्याबद्दल ली डॉक्टरांचे खूप आभार मानतात.
एंकिलॉजिंग स्पॉन्डिलाइटिस हा आजार अतिशय दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा आहे. हा आजार उद्भवल्यास माणसाच्या जीन्स मध्ये मोठी समस्या निर्माण होऊ शकते. या आजारात शरीरातील हाड वाकडी होतात आणि सुज येते. कारण त्यावेळी शरीर अतिरिक्त कॅल्शियंम निर्माण करतं. अशा आजारात सर्जरी करणं धोकादायक सुध्दा ठरू शकतं.