Cholesterol Control Ayurvedic Tips : कोलेस्ट्रॉल मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो. जो आपल्या रक्त नलिकांमध्ये चिकटून बसतो आणि रक्त पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. आपण जे काही खातो त्यातून कोलेस्ट्रॉल तयार होतं. हे तयार झाल्याने काही नुकसान होत नाही, पण याचं प्रमाण वाढलं तर मग नुकसान होतं. नसांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा सप्लाय व्यवस्थित होत नाही. जर वेळीच यावर उपाच केला गेला नाही तर हार्ट अटॅक यायला वेळ लागणार नाही.
जर तुम्हाला औषधं न घेता कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायची असेल तर आम्ही तुम्हाला 5 उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही कोलेस्ट्रॉल वेळेवर कमी कर शकता आणि आपला जीव वाचवू शकता.
आहारात या गोष्टींचा करा समावेश
कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, लसूण, कांदा, सूप आणि कढीपत्त्याचा समावेश करा. नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी मोहरीच्या आणि तिळाच्या तेलाने भाजी करा.
आवळा आणि आल्याचा ज्यूस
रक्तात ट्राइग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉल वाढल्याने नसां ब्लॉक होतात. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका राहतो. यापासून बचावासाठी तुम्ही आल्याचा आणि आवळ्याचा ज्यूस घ्या. 10 मिली आवळ्याचा रस आणि 5.5 मिली आल्याचा रस मिक्स करून घ्या. रोज सकाळी रिकाम्या पोटी याचं सेवन करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.
योगा आणि एक्सरसाइज
हाय कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यासाठी मानसिक तणावापासून दूर रहा. यासाठी रोज कमीत कमी 20 मिनिटे योगा किंवा एक्सरसाइज करा. याने तणवा कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलही आपोआप कमी होतं.
रोज अर्धा तास करा जॉगिंग
हाय कोलेस्ट्रॉलपासून वाचवण्यासाठी रोज फिजिकल अॅक्टिविटी करणं फार गरजेचं असतं. जेव्हा आपण कोणतीही शारीरिक हालचाल करत नाही तेव्हा विषारी पदार्थ घामाच्या माध्यमातून शरीरातून बाहेर निघू शकत नाही. त्यामुळे रोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटे जॉगिंग करणं आवश्यक आहे.
रात्री जास्त जड खाऊ नये
ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या झाली आहे, त्यांनी जड आहाराऐवजी हलका लवकर पचन होईल असा आहार घ्यावा. जेवणाची एक निश्चित वेळ ठरवा.