अलिकडे लाइफस्टाईलबाबत आणि हेल्थबाबत बरेच लोक वाचत-ऐकत असतात. अशात बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) हा शब्द सर्वांनाच परिचीत आहे. याचा अर्थ होतो एलडीएल म्हणजे लो डेंसिटी लिपो प्रोटीन. हे मानवी शरीरात हृदयात आढळून येणारा एक असा चिकट पदार्थ आहे ज्याचं प्रमाण जास्त झालं तर हृदयासंबंधी आजारांचा धोका निर्माण होतो.
शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त झाल्याने नसांमध्ये रक्तसंचार ब्लॉक होतो. ज्याने हार्ट अटॅकसारखी गंभीर समस्या निर्माण होतात. अशात कोलेस्ट्रॉक कमी करणं किंवा वाढू न देणं हा एक महत्वाचा उपाय आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचा वापर डाएटमध्ये करून तुम्ही तुमचं वजनही कमी करू शकता आणि कोलेस्ट्रॉल लेव्हलमध्ये बदल आणू शकता.
ऑलिव ऑइल - दिवसातून दोन चमचे ऑलिव ऑइलचा वापर केल्यास एलडीएलचं प्रमाण शरीरात कमी होऊ शकतं. सोबतच यात अॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असल्याने याचे वेगवेगळे फायदेही आरोग्याला होतात.
नट्स - ज्या पदार्थांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं त्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत मिळते. हे ओमेगा ३ फॅटी अॅसिड नट्स आणि बदामात जास्त प्रमाणात असतं.
लसूण - लसणाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत मिळते. आयुर्वेदातही हा सर्वात चांगला उपाय मानला आहे. लसणाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो. दिवसातून २ ते ४ लसणाच्या कळ्या खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं.
डार्क चॉकलेट - चॉकलेट नैसर्गिकरित्या एक फार चांगलं अॅंटी-ऑक्सीडेंट असतं. डार्क चॉकलेट यासाठी जास्त चांगलं कारण यात इतर चॉकलेटच्या तुलनेत ३ पटीने जास्त अॅंटी-ऑक्सीडेंट्स असतात.
(टिप - वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधाारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे हे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आणि तुम्हाला काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.)