दालचिनी आहे गुणकारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 3:56 PM
दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ फक्त जेवणाचीच चव वाढवत नसून, आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. रोज थोडी दालचिनी खाल्ल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांचे निवारण होत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
-रवीन्द्र मोरे दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ फक्त जेवणाचीच चव वाढवत नसून, आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. रोज थोडी दालचिनी खाल्ल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांचे निवारण होत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. * पचनसंस्थेत सुधारणाबहुतेक जणांना पचनसंस्थेच्या तक्रारी असतात. त्यांनी रोज एक चमचा दालचिनी खाल्ल्यास त्यातील अॅँटी आॅक्सिडंट्समुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. विशेषत: सकाळी दालचिनी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. * रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदतबऱ्याचजणांच्या शरीरात रक्त घट्ट होणे किंवा रक्तात गाठी तयार होणे आदी समस्या असतात. अशांनी रोज दालचिनी खाल्ल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते. यातील नैसर्गिक घटकामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. * हृदयरोगाचा धोका टळतो बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव पडून बहुतेकजण हृदयरोगाने त्रस्त आहेत. दालचिनीत अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने रोज सेवन केल्यास हे शरीरात खराब कोलोस्ट्रॉल जमा होण्यापासून वाचवतात. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो. * ऊर्जेचे स्त्रोतअशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास एक चमचा दालचिनी घेऊन ती पाण्यात उकळा. हे पाणी चहाप्रमाणे प्या. यामुळे थकवा दूर होऊन ऊर्जा मिळेल. * श्वसनाच्या विकारांपासून सुटकादालचिनीमध्ये अँटीमायक्रोबिअल गुण असल्याने रोजच्या सेवनाने श्वसनाच्या विकारांपासून सुटका होते. शिवाय दालचिनी संक्रमण तयार करणारी बुरशीदेखील नष्ट करते. * संधिवातापासून आरामआज उतार वयात बहुतांश लोकांना संधिवाताचा त्रास आहे. दालचिनीतील दाहकताविरोधी गुणांमुळे संधिवातापासून आराम मिळण्यास मदत होते. यासाठी दिवसातून एकदा कोमट पाण्यासोबत दालचिनी घ्या. * वजन कमी होण्यास उपयुक्त आज लठ्ठपणाच्या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. अनेक उपायांपैकी दालचिनीदेखील वजन कमी करण्यास उपयुक्त असल्याचे अनेक संशोधनांतून लक्षात आले आहे. यासाठी सकाळी एक ग्लास गरम पाण्यासोबत एक चमचा दालचिनी घ्या.