कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात वाढत चालला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांवर गेली आहे. तर एकूण बळींचा आकडा १३ हजार ७०० पेक्षा जास्त आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून अनेक कंपन्या कोरोना विषाणूंवरील लस शोधत आहेत. सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. भारतातील अनेक कंपन्या कोरोनाचे औषध तयार करण्यासाठी वैद्यकिय चाचण्या करत आहेत.
दरम्यान देशातील प्रसिद्ध कंपनी सिप्लाने कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर हे जेनेरिक औषध तयार करण्याचे ठरवले आहे. या कंपनीने जेनेरिक सिप्रेमी असे औषध तयार केले आहे. सिप्रेमी हे कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे जेनेरिक व्हर्जन आहे. भारतात रेमडेसिवीर हे औषध सिप्रेमी या ब्रँण्डनेमखाली उपलब्ध होणार आहे. अमेरिकेतील संस्था यूएसएफडीए ने कोविड-19 च्या रुग्णांसाठी आपातकालीन स्थितीत हे औषध रुग्णांना देण्याची मान्यता दिली आहे.
रेमडेसिवीर हे एकमात्र असे औषध आहे. ज्याला कोविड 19 च्या रुग्णांच्या उपचारांसाठी यूएसएफडीएने पाठिंबा दिला आहे. ग्लेनमार्कच्य फॅबीफ्ल्यू आणि हिटेरोज कोविफॉर पाठोपाठ आता सिप्रेमी हे अॅंटिव्हायरल औषध सुद्धा कोरोनावरील उपचारासाठी उपब्ध होणार आहे. मागच्या आठवडयात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपातकालीन स्थितीत रेमडेसिवीर हे औषध वापरायला परवानगी दिली.
गिलियड सायंसेजने मे महिन्यात सिप्ला कंपनीसह रेमडेसिविर औषधाची निर्मीती आणि विपणनासाठी हातमिळवणी केली आहे. सिप्ला कंपनीने दिलेल्या माहितीनुसार डीसीजीआई ने आपातकालीन स्थितीत या औषधाच्या वापरासाठी परवागनी दिली आहे. याशिवाय या औषधाच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. विपणनानंतर रुग्णांसंबंधीत संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर भारतातील रुग्णांवर चौथ्या टप्प्यात वैद्यकिय परिक्षण केले जाणार आहे.
सिप्रेमीची भारतात किती किंमत असेल ते अजून सिप्लाने जाहीर केलेले नाही. सिप्ला गिलियड कंपनीचे सीईओ उमंग वोहरा यांनी माध्यमांना सांगितले की, कोविड19 च्या माहामारीने लाखो लोक प्रभावित झाले आहेत. या आजारातून लोकांचा वाचवण्यासाठी कंपनीने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
कानांमार्फतही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? माहीत करून घ्या संक्रमणाबाबत फॅक्ट्स
कोरोनाच्या माहामारीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून 'असा' करा बचाव; जाणून घ्या उपाय