शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

लघवीचा रंग पूर्णपणे क्लिअर दिसणं म्हणजे या समस्यांचे आहेत संकेत, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 2:18 PM

Clear Urine Color : तुम्ही सकाळी उठून लघवी पास करत असाल तर याचा रंग फार जास्त पिवळा दिसतो. याचा अर्थ हा आहे की, शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडले आहेत.

Clear Urine Color :  असे अनेक पदार्थ असे असतात ज्यामुळे आपल्या लघवीचा रंग बदलतो. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशननुसार, कधी कधी काही आजारांमुळेही लघवीचा रंग बदलू शकतो. अशात तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे शरीर हायड्रेट असेल तर लघवीचा रंग ट्रान्सपरन्ट आणि हलका पिवळा दिसतो. पण जर तुमच्या लघवीचा रंग पूर्णपणे क्लिअर असेल तर याचा अर्थ हा आहे की, तुम्ही पाण्याचं सेवन फार जास्त प्रमाणात करत आहात आणि गरजेचं आहे की, तुम्ही याचं सेवन थोडं कमी करावं.

तुम्ही सकाळी उठून लघवी पास करत असाल तर याचा रंग फार जास्त पिवळा दिसतो. याचा अर्थ हा आहे की, शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडले आहेत. पण सकाळच्या लघवीचा रंग जर क्लिअर दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी पित आहात. हे बरोबर करण्यासाठी तुम्ही पाण्याचं सेवन थोडं कमी करावं.

त्याशिवाय इतरही काही कारणे आहेत ज्यामुळे लघवीचा रंग पूर्णपणे क्लिअर दिसतो. डायबिटीस इंसिपिडस एक असामान्य आजार आहे ज्यामुळेही शरीरातील फ्यूइडचं प्रमाण अनियंत्रित होतं. यात व्यक्तीला फार जास्त तहान लागते आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते. 

क्लिअर लघवी आणि मद्यसेवन

यूरोलॉजी केअर फाउंडेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, ड्यूरेटिक मेडिकेशनमुळेही पुन्हा पुन्हा लघवीच्या समस्येचा सामना करावा लागतो. सोबतच यात लघवीचा रंगही क्लिअर दिसू लागतो. नॅशनल असोसिएशन फॉर कॉन्टिनेन्समध्ये सांगण्यात आलं आहे की, दारूचाही ड्येरिटिक इफेक्ट होतो. दारूचं सेवन केल्याने लघवी जास्त वेळ येते आणि पुन्हा पुन्हा लघवी केल्याने लघवीचा रंगही क्लिअर दिसू लागतो. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने जास्त लघवी करणे आणि दारूचं सेवन यातील संबंध सांगितला आहे.

वयस्कांसाठी जास्त लघवी करण्याचा अर्थ एका दिवसात 2.5 लीटर लघवी शरीरातून बाहेर निघणं. तुमच्या लघवीचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं. कारण हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही दिवसभर किती पाणी पिता. जर तुमच्या शरीरात कॅल्शिअमचं प्रमाण कमी किंवा जास्त असेल तर तुम्हाला फार जास्त लघवी पास करणे आणि क्लिअर लघवीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. दारू आणि कॅफीनचं एकत्र सेवन केलं तर लघवी जास्त वेळ येते. सोबतच यामुळे तुमच्या लघवीचा रंगही क्लिअर येतो.

लघवीचा रंग काय सांगतो?

पेल यलो - मार्शफील्ड क्लिनीकनुसार, जर तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा आहे तर याचा हा अर्थ आहे की, तुम्ही चांगल्याप्रकारे हायड्रेट आहात.

डार्क यलो - जर तुमच्या लघवीचा रंग डार्क यलो असेल तर याचा अर्थ हा आहे की, तुम्हाला डिहायड्रेशनचा धोका फार जास्त आहे आणि तुम्ही जास्त प्रमाणात पाणी सेवन करण्याची गरज आहे.

यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिआगो हेल्थनुसार, ऑरेंज यूरिनही तीन प्रकारची असते. लाइट ऑरेंज कलरची यूरिन हे दर्शवते की, तुम्हाला लवकरच डिहायड्रेशन होणार आहे. पण लिव्हरसंबंधी काही समस्यांमुळेही यूरिनचा रंग लाइट ऑरेंज येऊ शकतो. काही औषधांच्या सेवनामुळे तुमच्या लघवीचा रंग डार्क ऑरेंज होऊ शकतो. जार्क ऑरेंज यूरिन किंवा ब्राउन कलरची यूरिन गंभीर ड्रिहायड्रेशन आणि काविळची समस्या दर्शवते.

पिंक आणि रेड - काही पदार्थ जसे की, ब्लूबेरीज, रताळे इत्यादींचं सेवन केल्याने तुमच्या लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी दिसू शकतो. पण जर गुलाबी आणि लाल दिसण्यासोबतच यूरिनमधून रक्तही येत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे. 

निळा आणि हिरवा - लघवीचा रंग निळा आणि हिरवा दिसत असेल तर हे काही खास औषधांमुळे होऊ शकतं. हा व्हजायनल म्यूकलचा संकेत असू शकतो. तशी तर लघवीमध्ये फेस दिसणं ही काही गंभीर समस्या नाही. पण जर असं नेहमीच होत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात प्रोटीनचं प्रमाण फार जास्त आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य