लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सफरचंदासह संत्री व मोसंबीची आवक वाढू लागली आहे. सीताफळलाही ग्राहकांची पसंती मिळत असून, फळांच्या बाजारात सद्यस्थतीमध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी भाव खात असून होलसेल मार्केटमध्ये ती १२० ते २५० रुपये किलो दराने विकली जात आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये सरासरी दोन हजार टन फळांची आवक हाेत आहे. हिमाचलच्या सफरचंदाचा हंगाम संपत आला असला तरी कोल्डस्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्यामुळे वर्षभर सफरचंद ग्राहकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असते. सद्यस्थितीमध्ये ४५० टनपेक्षा जास्त आवक होऊ लागली आहे. सफरचंदानंतर सर्वाधिक आवक संत्र्याची होत आहे. अमरावती व नागपूरवरून शुक्रवारी तब्बल २३८ टन संत्र्याची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये २५ ते ५० व किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपयांपर्यंत दर मिळू लागला आहे. जवळपास १५० टन मोसंबीचीही आवक होऊ लागली आहे.
राज्याच्या विविध भागातून ६० टन सीताफळाची आवक होत आहे. फळ मार्केटमध्ये महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चर्चा आहे. मार्केटमध्ये २५ ते ३० टन आवक होत आहे. स्ट्रॉबेरीला १२० ते २५० रुपये दर मिळत आहे. आवक वाढल्यामुळे बाजार समितीचे फळ मार्केट संत्री व मोसंबीमय झाले आहे.
शुक्रवारची आवक व प्रतिकिलो भाव फळ आवक (टन) बाजारभाव सफरचंद ४५५ ६५ ते १४०संत्री २३८ २५ ते ५०मोसंबी १३७ ३० ते ६०स्ट्रॉबेरी २८ १२० ते २५०खरबूज ७७ २५ ते ३५अननस १५९ २० ते ४०कलिंगड १७७ १२ ते १६पपई १६६ १४ ते ३०