स्त्रियांंमध्ये आणि पुरूषांमध्ये उद्भवत असलेल्या कॅन्सरचे प्रकार वेगवेगळे असतात. जगभरात हार्ट अटॅकनंतर मृत्यूचं कारण आहे ते म्हणजे कॅन्सर. ग्लोकनच्या २०१८ च्या डेटानुसार १८५ देशांमध्ये सामान्यपणे ३६ कॅन्सर प्रकारचे कॅन्सर सर्वाधिक पसरत आहेत. भारतीय पुरूषांमध्ये सगळ्यात जास्त प्रचलित असणारे कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर, फुप्पुसांचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर यांचा समावेश होते. पण सगळ्यात कॉमन दिसून येत असलेले कॅन्सरचे प्रकार म्हणजे तोंडाचा कॅन्सर आणि फुप्पुसांचा कॅन्सर.
या आजारात २५ टक्क्यांपेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झालेला दिसून येतो. जर सुरूवातीला तुम्हाला कॅन्सरच्या या अवस्थेबद्दल कळलं तर तुम्ही उपचार घेऊन बरे होऊ शकता. म्हणून आज आम्ही तुम्हाला कॅन्सरची माहिती मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासण्यांबदद्ल सांगणार आहोत.
तोंडाचा कॅन्सर
तोंडाचा कॅन्सर भारतात सगळ्यात जास्त दिसून येतो. याचं कारण असं की मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक तंबाखू, पान, गुटखा आणि दारूचं सेवन करतात. त्यामुळे ओठ, गाल यांच्यामार्फत हा कॅन्सर मोठा होत जातो. सर्वसाधारणपणे तोंडाच्या बाहेरच्या भागाला ट्यूमर सारख्या समस्या जाणवतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही सीटी स्कॅन, एमआरआई करून या कॅन्सरची तपासणी करू शकता.
फुप्पुसांचा कॅन्सर
फुप्पुसांचा कॅन्सर भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात सगळ्यात जास्त दिसून येतात. याचं सगळ्यात मोठं कारण सिगारेट, दारू आणि हुक्का यांचे अतिसेवन हे आहे. फुप्पुसांच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी सीटी स्कॅन किंवा LDCT टेस्ट केली जाते. तसंच हा कॅन्सरचा प्रकार ५५ चे ७५ वर्षापर्यंतच्या वयोगटात दिसून येतो.
प्रोस्टेट कॅन्सर
(Image credit- medscape)
प्रोस्टेट कॅन्सरचा धोका फक्त पुरूषांना असतो. आपल्या प्रोस्टेट ग्लॅंडला प्रभावित करत असतो. पुरूषांमध्ये वीर्य आणि मुत्र नियंत्रित करण्यासाठी हा महत्वपूर्ण असतो. रेडीओथेरेरपीद्वारे हा आजार बरा केला जाऊ शकतो. Prostate Specific Antigen टेस्ट सुद्धा म्हटलं जातं. ( हे पण वाचा-कधीच आजारी पडायचं नसेल तर वाचा पाणी पिण्याची योग्य पद्धत, 'हे' तर करूच शकता!)
पोटाचा कॅन्सर
(Image credit- medscape)
कोलन कॅन्सरची सुरूवात एखाद्या व्यक्तीमध्ये होते तेव्हा आतड्यांमध्ये लहान-लहान गाठीं जमा होतात. याच गाठी पुढे कॅन्सरचं कारण ठरत असतात. यासाठी फ्लेक्सिबल सिग्मॉइडोस्कोपी (Flexible Sigmoidoscopy), कोलोनोस्कोपी (colonoscopy), डबल कॉन्ट्रास्ट बेरियम एनीमा (double-contrast barium enema)आणि सीटी कोनोलोग्राफी CT colonography (virtual colonoscopy) यांसारख्या टेस्ट करून रक्त तपासणी केली जाते. मल तपासणी करत असताना अनेकदा डीएनए तपासणी सुद्धा करावी लागते. ( हे पण वाचा-वजन कमी करण्याचं टेंशन सोडा, बारीक होण्यासाठी दिवसातून फक्त इतकी पावलं चाला!)