Weight Loss Mistakes : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. डाएटमध्ये बदल, लाइफस्टाईलमध्ये बदल आणि वेगवेगळ्या एक्सरसाईज करून लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या गोष्टी करून आणि नियमांचं काटेकोर पालन करूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. अशात व्यक्तीची चिंता वाढणं आलंच. मात्र, वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत नकळत अशा काही चुका केल्या जातात, ज्यामुळे तुमच्या मेहनतीवर पाणी फेरलं जातं. अशात तुम्ही कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे जाणून घेऊ.
१) जास्त भाज्या खाणं म्हणजे जास्त वजन कमी होणं नाही
भाज्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण याचा अर्थ असा नाही की, भाज्या जास्त खाल तर वजनही जास्त कमी होईल. दिवसभरात ३०० ग्रॅमपेक्षा जास्त शिजवलेल्या भाज्या खाल्ल्यास शरीरात पाणी जमा होऊ शकतं. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं. त्यामुळे भाज्या योग्य प्रमाणात खाव्यात.
२) प्रोटीनसाठी केवळ डाळीवर अवलंबून राहणं
वेगवेगळ्या डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. पण मुळात डाळींमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक आणि प्रोटीन कमी असतं. त्याशिवाय डाळी पचायलाही जड असतात. जर वजन कमी करायचं असेल तर प्रोटीनच्या इतर सोर्सचा वापर केला पाहिजे. डेअरी प्रोडक्ट्स, टोफू किंवा नट्सचा आहारात समावेश केला पाहिजे.
३) कॅलरी न मोजणं
जर तुम्हाला वाटत असेल की, केवळ घरचं जेवण करूनच वजन कमी होईल, तर हा तुमचा गैरसमज आहे. एक्सपर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॅलरी डेफिसिटमध्ये राहणं गरजेचं आहे. म्हणजे रोज जेवढ्या कॅलरींची गरज असते, त्यापेक्षा कमी कॅलरी इनटेक कराव्या लागतील. जर तुम्ही कॅलरींचं प्रमाण मोजत नसेल तर वजन कमी करणं अवघड आहे.
४) जास्त वर्कआउटनं लवकर वजन कमी होत नसतं
जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, जास्त एक्सरसाईज केली तर त्यांचं वजन वेगानं कमी होईल. मात्र, वजन कमी करण्यात वर्कआउटचं योगदान केवळ २० ते ३० टक्के असतं. मुख्य भूमिका डाएटची असते. कॅलरीचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे, जर तसं झालं नाही तर तासंतास एक्सरसाईज करूनही तुमचं वजन कमी होणार नाही.
५) आवडीच्या गोष्टी खाणं सोडू नका
वजन कमी करण्याच्या नादात जर तुम्ही तुम्हाला आवडतात त्या गोष्टी खाणं बंद करत असाल तर तुम्ही चूक करताय. यामुळे उलट नुकसान होईल. असं केलं तर तुमची क्रेविंग वाढले आणि नंतर जास्त प्रमाणात खाल्लं जातं. यामुळे संतुलित प्रमाणात सगळ्याच गोष्टी खाव्यात आणि शरीर सुपरफूड्सच्या मदतीनं डिटॉक्स करा.