Bathing mistakes : बाथरूमचा तुमचं आरोग्य आणि जीवनाशी घनिष्ट संबंध आहे. एका रिपोर्टच्या आकडेवारीवरून समजतं की, तुम्ही तुमच्या जीवनातील साधारण 1.5 वर्ष बाथरूममध्ये घालवता. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनातील साधारण 6 महिने आंघोळ करण्यात घालवता. तसं तर या तथ्यात काहीच आश्चर्य नाही. कारण स्वच्छता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात फार महत्वाची भूमिका बजावते.
आंघोळ करणं आणि स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. पण काही लोक बाथरूममध्ये अशा चुका करतात की, ज्या त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. अर्थातच तुम्हाला त्यावेळी कळणार नाही, पण अशाप्रकारच्या चुकांचे नंतर गंभीर परिणाम होतात. चला जाणून घेऊ कोणत्या चुका टाळाव्यात.
वर्कआउटनंतर लगेच आंघोळ
काही लोक विचार करतात की, वर्कआउटनंतर लगेच आंघोळ करण्याचं एकमेव कारण दुर्गंधी आहे. पण इतरही काही कारणे असतात. घाम आपल्या त्वचेवर बॅक्टेरियाच्या उत्पादनाला उत्तेजित करतो. ज्यामुळे शरीरावर पुरळ येऊ शकते.
झोपण्याआधी थंड पाण्याने आंघोळ
सकाळी थंड पाण्याने आंघोळ केल्याने स्ट्रेस कमी होतो. इम्यून सिस्टम मजबूत होतं आणि तणाव कमी होतो. पण झोपण्याआधी थंड पाण्याने आंघोळ केली तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
रोज आंघोळ करणं आणि केस धुणं
ज्या लोकांचे केस पातळ आणि कमजोर असतात त्यांनी ते रोज धुण्यापासून वाचलं पाहिजे. केस धुण्यासाठी सर्वात चांगला पर्यात आठवड्यातून दोन दिवस असतो. ज्यामुळे केसांची मजबूती कायम राहते. एका रिपोर्टनुसार, रोज आंघोळ केल्याने त्वचेवर जळजळ आणि ओलावा कमी होऊ शकतो. कारण पाण्याने चांगले बॅक्टेरिया धुतले जातात. याने त्वचेवर संक्रमण होण्याची शक्यता असते.
शॉवर हेडची स्वच्छता
जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून शॉवर हेडचा वापर करत असाल, तर तुम्ही तो स्वच्छ केला पाहिजे. त्यात मळ, माती जमा झालेली असते. जे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांना आढळून आलं की, शॉवर हेड्सवर बॅक्टेरिया असू शकता जे तुमच्या फुप्फुसाच्या आजाराचं कारण ठरू शकतात.
जास्त दिवस एकच टॉवेल वापरणे
जास्त काळ एकाच टॉवेलचा वापर करू नका. जर तुम्ही अशा टॉवेलचा वापर करत असाल जो पूर्णपणे सुकलेला नाही तर त्यात बॅक्टेरिया असू शकतात. मायक्रोबायोलॉजिस्ट फिलिप टिएर्नो एकच टॉवेल धुण्याआधी 3 वेळा वापरण्याचा सल्ला देतात.