केवळ घामाच्या दुर्गंधीसाठीच नव्हे तर प्रेझेंटेबल राहण्यासाठी प्रत्येकजण बॉडी स्प्रे, डियो, परफ्युमचा वापर करतो. काही लोकांना बॉडी स्प्रे करणे एवढे आवडते की ते वेगवेगळे बॉडी स्प्रे दररोज वापरतात. परंतु आपल्याला कल्पनाही नसेल की, हे बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी घातक असतात. कसे? घेऊया जाणून१. डिओडोरंटचा रोज वापर केल्याने त्वचेवर लाल पुरळ उठते आणि खाज येण्यासारख्या समस्या उद्भवतात. बर्याच लोकांमध्ये परफ्युम किंवा डीईओसारख्या गोष्टींचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे कॉन्टॅक्ट डर्माटायटीस नावाचा एक आजार देखील उद्भवत आहे. यामध्ये त्वचा लाल होते, ती जळजळण्यास सुरुवात होते आणि कधीकधी सूज देखील दिसून येते.२. बॉडी स्प्रेच्या वापरामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. काही लोकांना तीव्र वास असलेल्या डिओडोरंटस पासून अॅलर्जी होते. बऱ्याच वेळा सुगंधित किंवा तीक्ष्ण सुवासमुळे लोकांना शिंका येणे, डोळ्यातून पाणी येणे किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. ही अॅलर्जीची लक्षणे आहेत, जी तीव्र सुगंधामुळे उद्भवतात.
३. बॉडी स्प्रे हे घामाचा वास कमी करण्यासाठी वापरतात. परंतु उलट यामुळे जास्त घाम येतो. घाम येण्याची प्रक्रिया वाढते. येणाऱ्या घामाला अधिक दुर्गंध येतो. बर्याच अभ्यासानुसार असे मानले जाते की शरीरातून घाम येणे फार महत्वाचे आहे आणि डीओ लागू केल्यामुळे घाम येत नाही, ज्यामुळे बर्याच समस्या उद्भवू शकतात. संशोधक म्हणतात की, घामामुळे शरीर डिटॉक्सिफाई होते. याशिवाय शरीर नैसर्गिकरित्या थंड होते. घाम येणे म्हणजे आपल्या शरीराच्या ग्रंथी चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. परंतु डीईओच्या वापरामुळे, ग्रंथी कमकुवत होतात आणि शरीरावर रोगांचा आक्रमण होण्याचे प्रमाण वाढते.४.बॉडी स्प्रेच्या अति वापरामुळे अंडर आर्म्स काळे पडतात. डियो थेट त्वचेवर वापरला तर या मुळे त्वचा काळपट होते. त्यामुळे परफ्युम किंवा डियो वापरताना काळजी घ्या. हे थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर स्प्रे करा.५.दागिने घालण्यापूर्वी परफ्युम स्प्रे करून घ्या अन्यथा या मुळे दागिन्यांच्या चमकण्यावर परिणाम होऊ शकतो.