अनेकजणांना असे वाटते की, वैद्यकीय गरज लागेल तेव्हा आरोग्य विमा काढून घेऊ आणि विम्याची रक्कमही ऐनवेळी वाढवून घेऊ; पण आरोग्य विमा पाहिजे तेव्हा खरेदी करता येत नाही. गुंतवणूक सल्लागार हर्ष रुंगटा यांनी सांगितले की, विमा काढणाऱ्याचे आरोग्य ठीक नसेल, तर कंपन्या आरोग्य विमा नाकारूही शकतात. त्यामुळे गरज पडेल तेव्हा आरोग्य विमा खरेदी करू, हा दृष्टिकोन घातक ठरू शकतो.
हे लक्षात असू द्याबहुतांश लोक ५ ते १० लाख रुपयांचे कव्हर असलेला आरोग्य विमा खरेदी करतात. तथापि, आज उपचारासाठी ५ लाख रुपयांची गरज असलेल्या आजारावर २० वर्षांनी १५ लाखांचा खर्च होऊ शकतो. त्यामुळे अधिक कव्हर असलेला आरोग्य विमा घ्या.
असे निवडा योग्य आरोग्य विमा प्लॅनफॅमिली फ्लोटर : यात एकाच प्लॅनमध्ये परिवारातील सर्व सदस्यांना कव्हर मिळते. मात्र, कव्हर तपासून घ्या. कारण अनेक प्लॅनमध्ये केवळ पती-पत्नी व मुले किंवा पालक व आजी-आजोबा यांनाच कव्हर असते. अशा अंशत: कौटुंबिक कव्हर असलेली पॉलिसी टाळून संपूर्ण परिवाराला कव्हर असलेल्या पॉलिसीला प्राधान्य द्या.
वैयक्तिक प्लॅन : आपला वैद्यकीय इतिहास पाहूनच हा प्लॅन घ्या.
कॅशलेस सुविधा : पॉलिसीत कॅशलेस कव्हर आहे की नाही, हे तपासून घ्या. कॅशलेस सुविधा असलेलीच पॉलिसी घ्या. तसेच त्यात काय काय कॅशलेस आहे, हेसुद्धा पाहून घ्या.
जोखिमेवर लक्ष द्याविमा घेताना भविष्यातील जोखिमेवरही लक्ष असू द्या. अचानक येणारा आजार, कमावत्या सदस्याचा मृत्यू, मुलांची शिक्षणे, लग्न यांचा विचार करून पॉलिसी घ्या.
आयसीयूचा खर्चअनेक कंपन्या आयसीयूच्या खर्चावर मर्यादा लादतात. त्यामुळे संपूर्ण उपचाराचा खर्च देणाऱ्या पॉलिसीचीच निवड करा. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होणाऱ्या प्रत्येक खर्चाला पॉलिसीत कव्हर असायला हवे. अनेक कंपन्या रुग्णालयातील खोली भाडे तसेच नर्सिंगच्या खर्चाला कव्हरच्या कक्षेत धरत नाहीत. पॉलिसी घेताना ही बाब नीट पाहून घ्या, अशी पॉलिसी घेण्याचे टाळा.
सेटलमेंट रेशोकंपनीचा सेटलमेंट रेशो उच्च आहे की निम्न हे तपासून घ्या. उच्च सेटलमेंट रेशो असलेल्या कंपन्यांची पॉलिसी घेण्यास प्राधान्य द्या.